Join us

मान्सूनपूर्व कामे रेल्वेने घेतली हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 7:18 PM

रेल्वे प्रशासन मान्सूनपूर्व कामे वेगात करत आहेत. 

 

मुंबई : दरवर्षी रेल्वे प्रशासन एप्रिल महिन्याच्या अखेरीस मान्सूनपूर्व कामे हाती घेते. मात्र लोकल सेवा, एक्सप्रेस सेवा सुरु असल्याने कामे करण्यास अनेक अडथळे येतात. त्यासाठी काही वेळा मेगाब्लॉक घेतले जातात. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा बंद आहे. त्यामुळे या काळात रेल्वे प्रशासन मान्सूनपूर्व कामे वेगात करत आहेत. पावसाळ्यात रेल्वे मार्गाकडील  नाल्यामुळे रेल्वे रुळावर पाणी साचून रेल्वे सेवा ठप्प होते. त्यामुळे सुरुवातीला नालेसफाई केली जात आहे.

पहिल्या फेरीत ३० किमीचा रेल्वे मार्गालगतची अरुंद नाल्यांची साफसफाई केली आहे. तर, १५० मोठ्या गटारांची स्वच्छता केली आहे. ज्याठिकाणी झाड्यांच्या फांद्या छाटण्याची आवश्यकता आहे, तेथे छाटणी सुरु आहे. जुन्या झालेल्या ओव्हर हेड वायर काढण्यात आल्या आहेत, अशी कामे पहिल्या फेरी झाली आहेत. दादर, भायखळा येथील भागातील अरुंद नाले, घाटकोपर येथील मोठा गटार, कळवा कारशेड येथे पम्पिंग लाईन दुरुस्त करणे, एलटीटी येथील अनावश्यक गवत काढले जात आहे. घाट भागातील ओव्हर हेड वायर दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची देखभाल करणे सुरु आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. ------------------------------अत्यावश्यक सेवेतील रेल्वे कमर्चारी मान्सूनपूर्व कामे करत आहेत. सोशल डिस्टन्स रेल्वे कर्मचाऱ्यामध्ये वापरले जात आहे. यासह सॅनिटायझर, मास्क प्रत्येक कर्मचाऱ्याला दिले जात आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

नालेसफाई, ओव्हर हेड वायर, रेल्वे रुळांची देखभाल, काही उपकरणांना गंजरोधक रंग लावण्याचे काम, रेल्वे हद्दीतील झाडांच्या फांद्यांची छाटणी, रुळांशेजारचा कचरा उचलण्याचे काम, नालेसफाईबरोबरच या सखल भागातील रुळांची उंची वाढवणे, त्यासाठी रुळांखाली खडी टाकणे, स्लीपर्स बसविण्याची कामे जोमात सुरु आहे.------------------------------

टॅग्स :मुंबईपाऊसमानसून स्पेशल