प्री-व्हॅलेंटाइन्स फोटो शूट
By admin | Published: February 10, 2016 04:08 AM2016-02-10T04:08:34+5:302016-02-10T04:08:34+5:30
फेबु्रवारी महिना उजाडताच परीक्षांचे वादळ डोक्यात सुरू होते, पण या वादळालाही थोपविणारा दिवस म्हणजे, तरुणाईच्या हक्काचा व्हॅलेंटाइन. यंगस्टर्स एरव्ही प्रत्येक क्षणाला
- कृतिका पाटील, मुंबई
फेबु्रवारी महिना उजाडताच परीक्षांचे वादळ डोक्यात सुरू होते, पण या वादळालाही थोपविणारा दिवस म्हणजे, तरुणाईच्या हक्काचा व्हॅलेंटाइन. यंगस्टर्स एरव्ही प्रत्येक क्षणाला लेन्समध्ये बंद करण्यासाठी धडपडत असतातच, पण ‘व्हॅलेंटाइन की बात तो कुछ और ही है,’ असे कॉलेजिअन्स सांगतात. यंदाचा ‘व्हॅलेंटाइन डे’ आणखी स्पेशल करण्यासाठी ‘प्री- व्हॅलेंटाइन शूट’चा ट्रेंड सध्या कॉलेजिअन्समध्ये दिसून येतोय. दिवसागणिक खुलणाऱ्या नात्याचे प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचे वेड तरुणाईला लागलेय.
वर्षांतील ३६५ दिवस प्रेम करण्यास तयार असणारी तरुणाई, व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी जरा जास्तच उत्सुक असते. हल्ली ‘प्री- वेडिंग’सारखाच ‘प्री-व्हॅलेंटाइन फोटो शूट’देखील तरुणाईच्या पसंतीस उतरला आहे. या प्री-व्हॅलेंटाइन फोटो शूटसाठी ‘कपल’चे ‘ड्रीम प्लेस’ म्हणजे बँडस्टँड. ‘होंगे जुदा ना हम’ म्हणत, ‘सेल्फी’ काढण्यात तरुणाईचा ‘हात’ कोणीही धरू शकत नाही. ‘वरळी सी-फेस’, ‘मरिन्स्’ अर्थात, मरिन लाइन्स, वांद्रे किल्ला या ठिकाणीही प्री- फोटोशूट करायला हरकत नाही.
त्या दिवशी हटके, पण ‘सेंन्सीबल’ ड्रेसअप करून फोटोशूट करता येईल. कँडीड, सेल्फी विथ हार्ट, सेल्फी विथ बेस्टीस अशा नानाविध स्टाईल आहेतच. पोझेसबाबत तरुणाईला सांगणे म्हणजे, शहाण्याला अक्कल शिकवण्यासारखे आहे. तरीदेखील एका पोझचा उल्लेख मात्र न विसरता केला आहे. प्रेमप्रसिद्ध पोझ म्हणजे गुडघ्यावर बसून, हातात गुलाबाचे फूल घेऊन क्लिक केलेला फोटो म्हणजे सगळ्या फोटोशूटमध्ये ‘चार चाँद’. या आठवणींचा एक मस्तपैकी ‘कोलाज’ करून तो फोटो कॉफी मग, पिलोवर छापून हटके गिफ्ट देण्याची तरुणाईमध्ये क्रेझ आहे.