राज्याला अवकाळी पावसाचा इशारा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 04:40 AM2020-01-05T04:40:45+5:302020-01-05T04:40:50+5:30

राज्याला देण्यात आलेला अवकाळी पावसाचा इशारा कायम असून, ८ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Precipitation rains continued for the state | राज्याला अवकाळी पावसाचा इशारा कायम

राज्याला अवकाळी पावसाचा इशारा कायम

Next

मुंबई : राज्याला देण्यात आलेला अवकाळी पावसाचा इशारा कायम असून, ८ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर मुंबई शहर आणि उपनगरातील आकाश ५ आणि ६ जानेवारी रोजी मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २७, १४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. तर ५ जानेवारीला गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
६ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. तर ७ जानेवारीला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहील. ८ जानेवारीला : विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
>शनिवारचे किमान तापमान
(अंश सेल्सिअसमध्ये)

मुंबई १५.५
पुणे ११.५
अहमदनगर १०.६
जळगाव १४.२
कोल्हापूर १५.१
महाबळेश्वर १०.७
मालेगाव १६.२
नाशिक ११.६
सांगली १३.९
सातारा ११.४
औरंगाबाद १०.७
परभणी १३.९
नांदेड १४
बीड १५.९
अकोला
११.८
अमरावती
१४
बुलडाणा १२.४
ब्रह्मपुरी १३.३
गोंदिया १३.८
नागपूर १४
वाशिम १२.४
वर्धा १६
यवतमाळ १४

Web Title: Precipitation rains continued for the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.