Join us

राज्याला अवकाळी पावसाचा इशारा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 4:40 AM

राज्याला देण्यात आलेला अवकाळी पावसाचा इशारा कायम असून, ८ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मुंबई : राज्याला देण्यात आलेला अवकाळी पावसाचा इशारा कायम असून, ८ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर मुंबई शहर आणि उपनगरातील आकाश ५ आणि ६ जानेवारी रोजी मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २७, १४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. तर ५ जानेवारीला गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.६ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. तर ७ जानेवारीला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहील. ८ जानेवारीला : विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.>शनिवारचे किमान तापमान(अंश सेल्सिअसमध्ये)

मुंबई १५.५पुणे ११.५अहमदनगर १०.६जळगाव १४.२कोल्हापूर १५.१महाबळेश्वर १०.७मालेगाव १६.२नाशिक ११.६सांगली १३.९सातारा ११.४औरंगाबाद १०.७परभणी १३.९नांदेड १४बीड १५.९अकोला११.८अमरावती१४बुलडाणा १२.४ब्रह्मपुरी १३.३गोंदिया १३.८नागपूर १४वाशिम १२.४वर्धा १६यवतमाळ १४