Join us

‘आॅनलाइन’ वैद्यकीय सेवेला पसंती

By admin | Published: May 30, 2017 6:39 AM

माहिती तंत्रज्ञानाच्या विस्ताराने सर्वच क्षेत्रांतील व्यवहार केवळ एका क्लिकवर करणे शक्य झाले आहे. त्यात आरोग्य क्षेत्रही आता मागे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या विस्ताराने सर्वच क्षेत्रांतील व्यवहार केवळ एका क्लिकवर करणे शक्य झाले आहे. त्यात आरोग्य क्षेत्रही आता मागे राहिले नाही. वैद्यकीय सल्ला देणारे विविध अ‍ॅप्लिकेशन्स आणि संकेतस्थळांच्या माध्यमातून आता डॉक्टर्स सल्ला देत आहेत. या वैद्यकीय सेवेतील ‘सोशल’ क्रांतीला सामान्य रुग्णही पसंती दर्शवित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता सर्दी, खोकला झाल्यास डॉक्टर्स चॅटिंगद्वारे किंवा कॉलद्वारे वैद्यकीय सल्ला देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे.‘डॉक्सअ‍ॅप’, ‘डॉक्टर इन्स्टा, ‘प्रॅक्टो’, ‘पोर्टिआ’, ‘मेडस्केप’, ‘युअर होम फॉर हेल्थ’ अशा अनेक अ‍ॅप्लिकेशन्सद्वारे चॅट किंवा कॉलच्या माध्यमातून रुग्णांना डॉक्टरांशी जोडणारे भारताचे सर्वांत मोठे आॅनलाइन हॉस्पिटल बनले आहे. दररोज १,२००हून अधिक लोक या अ‍ॅपवर आॅनलाइन स्पेशालिस्ट डॉक्टर्सचा सल्ला प्राप्त करतात. या आॅफलाइन खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून दररोज जवळपास हजार व्यक्तींना सल्ला देण्यात येतो.या ‘आॅफलाइन’ रुग्णसेवेविषयी डॉक्सअ‍ॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक, सतीश कन्नन म्हणाले, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, त्वचाविकारतज्ज्ञ, मधुमेहमधील प्राथमिक हेल्थकेअरसाठी वाजवी दरातील सल्ल्यांपासून हृदयरोग, संधिवात व कर्करोगावरील दुसरे मत देण्यापर्यंत, सामान्यांसाठी भौगोलिक क्षेत्रांमध्ये दर्जात्मक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. दुर्गम भागांमध्ये वास्तव्य करणारे सर्व व्यस्त व्यावसायिक व लोक कुठेही, कधीही दर्जात्मक वैद्यकीय सुविधा प्राप्त करू शकतात. २०१३मध्ये हेल्थकेअर परफॉर्मन्स मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटने सादर केलेल्या अहवानानुसार आणि ‘नॅशनल एम्बुलेटरी मेडिकल केअर सर्व्हे २००६ (आॅगस्ट २००८)’च्या मते, ७० टक्के आरोग्यविषयक आजार आॅनलाइन हाताळता येऊ शकतात आणि फक्त ३० टक्के आजारांसाठी रुग्णाला डॉक्टरकडे जावे लागते.