नागरी प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्या - मंदा म्हात्रे
By admin | Published: July 3, 2015 01:17 AM2015-07-03T01:17:04+5:302015-07-03T01:17:04+5:30
शहरातील नागरी समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे. प्रसाधनगृह, झोपडपट्टी व इतर ठिकाणचे प्रश्न तत्काळ सोडवावेत, अशा सूचना आमदार मंदा म्हात्रे
नवी मुंबई : शहरातील नागरी समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे. प्रसाधनगृह, झोपडपट्टी व इतर ठिकाणचे प्रश्न तत्काळ सोडवावेत, अशा सूचना आमदार मंदा म्हात्रे यांनी पालिका प्रशासनाला केल्या आहेत.
शहरातील समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. दिघा परिसरातील ईश्वर नगर परिसरात पुरेशी प्रसाधनगृहे नाहीत. अनेक ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध नाही. नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. औद्योगिक वसाहत व इतर ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शाळेसाठीही भटकंती करावी लागत आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या घराच्या परिसरात शाळा उपलब्ध असली पाहिजे, असे त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. शिरवणे गावातील मैदानाची सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. पथदिवे व गटारांची दुरुस्ती करण्यात यावी. पाण्याचा योग्य प्रकारे निचरा झाला पाहिजे. सीवूड सेक्टर ५० परिसरात हायमास्ट बसविण्यात यावेत, अशा सूचनाही करण्यात आल्या.
शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी प्रशासनास केल्या आहेत. यावेळी डॉ. राजेश पाटील, सुनील पाटील व भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.