Join us

अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 7:01 AM

सध्या केवळ तीन नियमित प्रवेशफेऱ्यांपैकी केवळ पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रांतील अकरावी प्रवेशाकरिता ५ जूनपासून विद्यार्थ्यांना कॉलेज आणि शाखांकरिता ऑनलाइन पसंतिक्रम देता येणार आहे. सध्या केवळ तीन नियमित प्रवेशफेऱ्यांपैकी केवळ पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

५ ते १५ जून दरम्यान  किमान एक व कमाल १० पसंतिक्रम नोंदविता येतील. डेटा प्रोसेसिंगनंतर पसंतिक्रमानुसार जागा दिली जाईल. या दरम्यान नवीन विद्यार्थीही नोंदणी करून अर्जाचा भाग-१ भरू शकतात. या विद्यार्थांना १६ जूनपर्यंत पसंतिक्रम भरता येतील. 

प्रवेशाचे वेळापत्रक५ ते १६ जून - प्रवेशासाठी पसंतिक्रम नोंदविणे, अर्जाचा दुसरा भाग ऑनलाइन सादर करणे, अर्ज लॉक करणे, अल्पसंख्याक, इनहाउस कोट्यासाठी ऑनलाइन पसंती नोंदविणे.१५ जून - अर्जाचा भाग १ सायंकाळी ४ पर्यंत भरता येईल.१८ ते २१ जून - भाग २ भरलेल्या व पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर कऱणे व भाग २ लॉक करणे. गुणवत्ता यादीत दुरुस्ती करण्यास त्यावर हरकती नोंदविणे. त्याचे संबंधित उपसंचालकांकडून निराकरण करणे.२२ ते २५ जून - प्रवेशासाठी जागांची निवडयादी वेबसाइटवर जाहीर कऱणे.  फेरीचा कटऑफ जाहीर करणे.२६ ते २९ जून - संबंधित जागेवर प्रवेश निश्चित कऱणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे. यावेळी कॉलेज लॉगिनमध्ये प्रवेश निश्चित करणे, रद्द करणे, प्रवेश नाकारणे या प्रक्रिया सुरू राहतील.२९ जून - प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर नोंदविणे.१ जुलै - दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे. यात कोट्यातील रिक्त जागांचा समावेश केला जाईल.

..तर प्रवेश घेणे अनिवार्यज्या विद्यार्थ्याला पहिल्या पसंतीचे महाविद्यालय अलॉट झाले असेल तर तिथे प्रवेश घेणे अनिवार्य आहे. जर प्रवेश घेतला नाही किंवा प्रवेश नाकारला गेला तर पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल.

टॅग्स :शिक्षण