अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी ५ जूनपासून पसंतीक्रम

By रेश्मा शिवडेकर | Published: June 1, 2024 11:05 PM2024-06-01T23:05:22+5:302024-06-01T23:05:37+5:30

पडताळणी झाल्यानंतर या विद्यार्थांना १६ जूनपर्यंत पसंतीक्रम भरता येतील.

Preference order for first round of 11th admission from 5th June | अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी ५ जूनपासून पसंतीक्रम

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी ५ जूनपासून पसंतीक्रम

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील अकरावी प्रवेशाकरिता ५ जूनपासून विद्यार्थ्यांना कॉलेज आणि शाखांकरिता ऑनलाईन पसंतीक्रम देता येणार आहे. सध्या केवळ तीन नियमित प्रवेश फेऱयांपैकी केवळ पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर कऱण्यात आले आहे.

५ ते १५ जून दरम्यान विद्यार्थ्यांना किमान एक व कमाल १० पसंतीक्रम नोंदविता येतील. डेटा प्रोसेसिंगनंतर पसंतीक्रमानुसार जागा दिली जाईल. या दरम्यान नवीन विद्यार्थीही नोंदणी करून अर्जाचा भाग-१ भरू शकतात. त्याची पडताळणी झाल्यानंतर या विद्यार्थांना १६ जूनपर्यंत पसंतीक्रम भरता येतील.

२२ जूनला जागावाटप जाहीर केले जाणार आहे. जागा वाटप झालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर विद्यार्थी पुढील प्रवेश फेरीची वाट पाहू शकतात. या दरम्यान इनहाऊस, अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशही केले जाणार आहेत.

 
..तर प्रवेश घेणे अनिवार्य

ज्या विद्यार्थ्याला पहिल्या पसंतीचे महाविद्यालय अलॉट झाले असेल तर तिथे प्रवेश घेणे अनिवार्य आहे. जर प्रथम प्रसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही किंवा प्रवेश नाकारला गेला तर पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल आणि त्या फेरीनंतरच प्रवेशासाठी त्यांचा विचार केला जाईल.
 

प्रवेश रद्द करायचा झाल्यास…

जर एखाद्या विद्यार्थ्याला निश्चित केलेला प्रवेश रद्द करायचा असेल तर त्यासाठी संबंधित महाविद्यालयाला विनंती करून प्रवेश रद्द करून घेता येईल. असे प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित होतील.
 
प्रवेशाचे वेळापत्रक

५ ते १६ जून - प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे, अर्जाचा दुसरा भाग ऑनलाईन सादर करणे, अर्ज लॉक करणे, अल्पसंख्याक, इनहाऊस कोट्यासाठी ऑनलाईन पसंती नोंदविणे

१५ जून - अर्जाचा भाग १ सायंकाळी ४ पर्यंत भरता येईल.

१८ ते २१ जून - भाग २ भरलेल्या व पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर कऱणे. व भाग २ लॉक करणे. गुणवत्ता यादीत दुरूस्ती कऱण्यास त्यावर हरकती नोंदविणे. त्याचे संबंधित उपसंचालकांकडून निराकरण करणे.

२२ ते २५ जून - प्रवेशासाठी जागांची निवडयादी वेबसाईटवर जाहीर कऱणे.  फेरीचा कटऑफ जाहीर कऱणे.

२६ ते २९ जून - संबंधित जागेवर प्रवेश निश्चित कऱणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे. यावेळी कॉलेज लॉगीनमध्ये प्रवेश निश्चित करणे, रद्द करणे, प्रवेश नाकारणे या प्रक्रिया सुरू राहतील.

२९ जून - प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर नोंदविणे

१ जुलै - दुसऱया फेरीसाठी रिक्त जागा जाहीर कऱणे. यात कोट्यातील रिक्त जागांचा समावेश केला जाईल.
 
पुढील प्रवेश फेऱयांच्या संभाव्य तारखा

दुसरी फेरी - २ ते ८ जुलै

तिसरी फेरी - ९ ते १८ जुलै

विशेष फेरी - १९ ते २६ जुलै

Web Title: Preference order for first round of 11th admission from 5th June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई