गर्भवतींनी तापाची लस टाळू नये; स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 01:49 AM2019-07-14T01:49:40+5:302019-07-14T01:49:47+5:30

लसीकरणाच्या अभावी गर्भवती महिलांना संसर्गजन्य आजारांची लागण होते.

Pregnant should not avoid vaccinations; Gynecologist advice | गर्भवतींनी तापाची लस टाळू नये; स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिला सल्ला

गर्भवतींनी तापाची लस टाळू नये; स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिला सल्ला

Next

मुंबई : लसीकरणाच्या अभावी गर्भवती महिलांना संसर्गजन्य आजारांची लागण होते. या माध्यमातून मातामृत्यू, अर्भकमृत्यू आणि बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते. तसेच बाळांना व्यंगही असण्याचा धोका संभवतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी विविध संसर्गाचा धोका टाळण्यासाठी लसीकरण घेतले पाहिजे. यात आता तापाची लस घेणे अत्यावश्यक आहे. ताप म्हणजेच फ्लू (इन्फ्लुएंजा) शॉट फ्लूचा प्रतिबंध करणारी लस घेणे ही आता काळाची गरज झाली आहे, असा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
बाळाला तापाचा संसर्ग होऊ नये म्हणून तसेच बाळाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीने तापाची लस घेतल्यास अधिक चांगले असल्याची माहिती तज्ज्ञ देतात. ताप आल्यास मुदतीपूर्व प्रसूतीची शक्यताही असते. याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे न्यूमोनियासारख्या (फुप्फुसांना होणारा संसर्ग) जटिल आजारांचा धोकाही कमी होतो.
यावर बोलताना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुरभी सिद्धार्थ यांनी सांगितले की,
गरोदर महिलेला तीन लसी दिल्या जातात. या लसींमधील विषाणू जिवंत नसतात. यापैकी दोन धनुर्वाताला प्रतिकार करणाऱ्या तर एक फ्लूला प्रतिकार करणारी आहे. आता एक टीडी व एक टीडॅप दिली जाते. धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकला प्रतिकारक लसी तर धनुर्वातासाठी लस प्रत्येक गरोदरपणात या लसीचा एक डोस घेण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे नवजात अर्भकाला संरक्षण मिळत असते.
आॅब्स्टेट्रिक्स अ‍ॅण्ड गायनॅकोलॉजीविषयक एका नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, नियमित प्रसूतीविषयक काळजीमध्ये गरोदरपणातील लसीकरण हा महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय
आहे. गरोदरपणात लसीकरण
झालेल्या मातांद्वारे प्रादुर्भावाशी
लढा देणारी प्रथिने, यांना
प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) असे म्हटले
जाते, त्यांच्या बाळांपर्यंत पोहोचवली जातात.

Web Title: Pregnant should not avoid vaccinations; Gynecologist advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.