गंभीर अवस्थेत असणाऱ्या गर्भवतीला मिळाले जीवनदान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 05:39 AM2020-06-06T05:39:45+5:302020-06-06T05:40:08+5:30
घाटकोपर परिसरातील सात महिन्यांची गर्भवती असलेल्या श्वेता वगारे यांना अचानकच अतिरक्तस्राव होऊ लागला. त्यामुळे रात्रीच नेहमीच्या स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनासारख्या रोगामुळे एकीकडे गर्भवती मातांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी येत असतांना, दुसरीकडे मात्र, एका सात महिने पूर्ण होणाºया गर्भवती महिलेला अतिरक्तस्रावाचा त्रास होऊ लागला. खासदार सुप्रिया सुळेंच्या मध्यस्तीने योग्य वेळेवर उपचार मिळू शकल्याने गर्भवती महिलेचा जीव वाचला आहे.
घाटकोपर परिसरातील सात महिन्यांची गर्भवती असलेल्या श्वेता वगारे यांना अचानकच अतिरक्तस्राव होऊ लागला. त्यामुळे रात्रीच नेहमीच्या स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र अत्याधुनिक सुविधा नसल्याने, वगारे यांना वाडिया रुग्णालयांमध्ये जाण्याचे सांगितले. मात्र, वाडिया रुग्णालयांमध्ये कोविड चाचणी केल्याशिवाय घेत नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, वगारे यांच्या कुटुंबीयांना खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या मध्यस्तीने जे जे रुग्णालयामध्ये तत्काळ उपचार मिळाले.
वगारे कुटुंबात येणारे नवजात बालक दगावले; मात्र, अतिरक्तस्रावामुळे जिवाला धोका असलेल्या मातेला वाचविण्यात यश आले. जे जे रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी कांबळे यांनी रुग्णालयामध्ये गर्भवती मातेच्या आरोग्याची काळजी घेतली. तर भाटिया रुग्णालयात गर्भधारणेची वेळ जवळ आलेल्या कोविडबाधित गर्भवती महिलेवर उपचार करण्यात आले.
गंभीर अवस्थेत आलेल्या या महिलेला दोन रुग्णालयांनी नाकारल्याने प्रकृती बिघडत चालली होती, अशा स्थितीत भाटिया रुग्णालय प्रशासनाने या महिलेची सिझेरियन प्रसूती यशस्वी केली आहे.