प्रीती झिंटा प्रकरण: साक्षीदारच महत्त्वाचे ठरणार
By admin | Published: June 26, 2014 01:07 AM2014-06-26T01:07:24+5:302014-06-26T08:41:22+5:30
प्रीती झिंटा छेडाछाड प्रकरणाच्या तपासाचा पुढील प्रवास आतापर्यंत समोर आलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबावर अवलंबून आहे.
Next
>सीसीटीव्हीत घटना नाही
मुंबई : उद्योगपती नेस वाडिया यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांना वानखेडे स्टेडीयममधील सीसीटीव्हींचा काही उपयोग झालेला नाही. पाच सीसीटीव्हींचे चित्रण पोलिसांनी तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र त्यात अभिनेत्री प्रीती झिंटा आणि वाडिया यांच्यातील वादावादी पुरावे पोलिसांना सापडलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाचा पुढील प्रवास आतापर्यंत समोर आलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबावर अवलंबून आहे.
काल पुरवणी जबाब देताना प्रीतीने पोलिसांना पाच ते सहा नव्या साक्षीदारांची नावे दिली. एका वरिष्ठ अधिका:याने दिलेल्या माहितीनुसार, साक्षीदारांचे जबाब नोंदवून पूर्ण झाले की पोलिसांचा मोर्चा वाडियांकडे वळेल. या अधिका:याने पुढील कारवाईची थेट व नेमकी माहिती न देता कायद्यातील तरतुदींनुसार ती होईल असे सांगितले. पोलीस नेस यांना समन्स धाडून चौकशीसाठी बोलावतील आणि तेथेच अटक करून न्यायालयात हजर करतील. दरम्यान, गरवारे स्टॅण्डभोवतीच्या पाच कॅमे-यांमध्ये एकाही चित्रणात नेस आणि प्रीती यांच्यातील वाद दिसत नाही. (प्रतिनिधी)
पोलीस आता सोनी चॅनेलकडून व्हीडीओ कॅमे:यांचे चित्रण मिळण्याची वाट पाहत आहेत. या कॅमे-यांमधूनही घटना स्पष्ट झाली नाही तरी साक्षीदारांनी नोंदविलेल्या जबाबाचा आधार घेऊन वाडीया यांच्यावर पुढील कारवाई होईल, असे अन्य एका अधिका:याने सांगितले.
प्रीतीचा अमेरिकी मित्र करू शकेल पोलिसांना मदत
डिप्पी वांकाणी - मुंबई
ङिांटा - वाडिया प्रकरणात प्रीतीचा अमेरिकी मित्र जीन गॉडीनफ मदत करू शकेल, असे मुंबई पोलिसांना वाटते. त्याचा जबाब नोंदवायचा होता. पण आता तो भारताबाहेर असल्याने त्याचा जबाब नोंदवता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.
आयपीएल स्पर्धेत खेळणारा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू कॅमेरॉन व्हाइट याचा तो नातेवाईक असून, 3क् मे रोजी जेव्हा प्रीती आणि वाडिया यांचा कथित वाद झाला त्या वेळी तो हजर होता. त्याने दोघांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्नही केला होता. तो या प्रकरणावर महत्त्वपूर्ण प्रकाश टाकू शकतो. प्रीतीने आपल्या दुस:या जबाबात पोलिसांना सांगितले आहे, की वाडिया यांनी त्यांच्या संघाच्या कर्मचा:यांना तिकीट वाटपावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. प्रीतीने त्यांना संघ जिंकत असल्याने शांत राहण्यास सांगितले. पण वाडिया यांनी उलट प्रीतीचा हात धरून तिचा विनयभंग करीत असताना तेथे हजर असलेल्या जीनने दोघांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. यासंदर्भात एका पोलीस अधिका:याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की ङिांटा यांनी जो घटनाक्रम वर्णन केला त्यानुसार आम्हाला जीनचा जबाब नोंदवायचा होता. पण सध्या जीन भारतात नाही.
पोलिसांनी प्रीतीने मंगळवारी दाखवलेल्या तीन ठिकाणांचे सीसीटीव्ही मिळवण्यासाठी पोलिसांनी वानखेडे स्टेडियमच्या व्यवस्थापकांकडे मागणी केली आहे.