कोर्टासमोर पार्क केलेल्या कारमध्ये प्रेमीयुगुलाची आत्महत्या; मुलुंडमधील धक्कादायक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:43 AM2018-06-07T00:43:47+5:302018-06-07T00:43:47+5:30

मुलुंड कोर्टाबाहेर पार्क केलेल्या कारमध्ये विष प्राशान करून सलमान खान (२७) आणि मनीषा नेगी (२१) या प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. कॉलेज प्रेमातून दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

 Prem Kamal sued suicide in parked car before court; Shocking type of Mulund | कोर्टासमोर पार्क केलेल्या कारमध्ये प्रेमीयुगुलाची आत्महत्या; मुलुंडमधील धक्कादायक प्रकार

कोर्टासमोर पार्क केलेल्या कारमध्ये प्रेमीयुगुलाची आत्महत्या; मुलुंडमधील धक्कादायक प्रकार

Next

मुंबई : मुलुंड कोर्टाबाहेर पार्क केलेल्या कारमध्ये विष प्राशान करून सलमान खान (२७) आणि मनीषा नेगी (२१) या प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. कॉलेज प्रेमातून दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. धर्मभेदामुळे दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांना नाकारले. पुढे त्यांच्या प्रेमापुढे हळूहळू कुटुंबाचा नकार होकारमध्ये बदलला. मात्र, त्यांचा कुटुंबावर विश्वास नसल्याने ते आपल्याला वेगळे करतील, या भीतीने दोघांनी स्वत:चे आयुष्य संपविल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक तपासात समोर येत आहे. मुलुंड पश्चिमेकडील एसीसी रोड परिसरात सलमान खान हा आईवडील आणि चार भावांसोबत राहायचा. पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच त्याचे नवी मुंबईच्या दिघा गावातील मनीषा नेगीसोबत प्रेमसंबंध जुळले. ते गेल्या चार वर्षांपासून एकत्र होते. खान याचे मुलुंडमध्ये नेक्स्ट कपड्यांचे दुकान आहे, मनीषा मॉलमध्ये कामाला होती़

वेदना कायम राहते...
खेदजनक बाब अशी की, ‘आत्महत्येमुळे वेदना संपत
नाही, ती कायम राहून दुसऱ्याकडे जाते आणि केवळ याच विचारामुळे मी अजूनही इथेच आहे,’असा संदेश लिहिलेली पोस्ट सलमान खान याने काहीच दिवसांपूर्वी त्याच्या फेसबुक अकाउंटवर शेअर केली होती.

दोन वर्षांनी थेट
मृत्यूचीच बातमी आली
बारावीच्या परीक्षेदरम्यान आमची ओळख झाली. ती मनमिळावू होती. आम्ही चांगले मित्र होतो. मात्र, मध्यंतरी संपर्क तुटला. त्यात दोन वर्षांनंतर थेट तिच्या मृत्यूचीच बातमी कानावर पडल्याने धक्का बसल्याचे मनीषाचा मित्र ए. व्ही. गुप्ता याने सांगितले.

ती भेट अखेरची ठरली...
मंगळवारी सकाळी सलमान घरी आला. तेथून ११ वाजता तो दुकानातही गेला. त्यानंतर तो परतलाच नाही. ती भेट अखेरची ठरेल असे वाटले नव्हते, असे सलमानचे वडील आफरोश यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मुलाचे प्रेमसंबंध माहिती होते. आम्ही त्यांच्या लग्नालाही तयार होतो. त्याने कधीच मुलीला समोर आणले नाही. किंवा आम्हाला तिच्या घरी जाऊ दिले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

परदेशात थाटायचा
होता व्यवसाय
सलमानला परदेशात जाऊन स्वत:चा व्यवसाय थाटायचा होता. त्यासाठी त्याचे प्रयत्नही सुरु होती. तसेच काही दिवसात ठाणे येथे स्वत:चे कपड्यांचे दुकान उघडणार असल्याचेही त्यांनी मित्राला सांगितले होते.

शीतपेयातून घेतले विष
सलमानच्या कारमधून शीतपेयाच्या बॉटलसह विषाची बाटली सापडली आहे. त्यामुळे त्याने शीतपेयातून विष घेतल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. शवविच्छेदनाच्या अहवालातून याचे नेमके कारण समोर येणार असल्याचे मुलुंड पोलिसांनी सांगितले.

खर्चासाठी विकले मोबाइल
गेल्या ८ दिवसांपासून मनीषा आणि सलमान कुटुंबापासून वेगळे झाले होते. मात्र, सलमान घरी येत जात होता. आठ दिवसांत स्वत:कडील पैसे संपल्याने दोघांनीही आपापले मोबाइल विकल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यांचे सिम कार्ड एका कागदात गुंडाळलेल्या अवस्थेत सापडले आहेत.

Web Title:  Prem Kamal sued suicide in parked car before court; Shocking type of Mulund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.