लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातील प्रीपेड रिक्षा स्टॅन्ड बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:07 AM2021-09-21T04:07:21+5:302021-09-21T04:07:21+5:30
मुंबई गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात प्रीपेड रिक्षा स्टॅन्ड सुरु करण्यात आले होते. मात्र, प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे ते ...
मुंबई
गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात प्रीपेड रिक्षा स्टॅन्ड सुरु करण्यात आले होते. मात्र, प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे ते बंद आहे. गेल्यावर्षी मुंबईमध्ये प्रथमच प्रीपेड रिक्षा सेवा सुरु झाली होती. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे उभारण्यात आलेल्या प्रीपेड रिक्षा स्टँडचे उदघाटन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते झाले होते.
एलटीटी येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो प्रवासी मुंबईत ये-जा करीत असतात. परंतु, या प्रवाशांच्या लुटीच्या आणि असुरक्षिततेच्या घटना वारंवार समोर येत होत्या. अशावेळी आता हे प्रीपेड रिक्षा स्टँड प्रवाशांना सुरक्षित आणि योग्य दरात रिक्षा सेवा पुरवत होते. मात्र, कोरोनामुळे प्रवाशांच्या संख्येत घट झाल्यानंतर हे स्टॅन्ड बंद ठेवण्यात आले होते. अद्यापही अल्प प्रतिसाद असल्याने ते बंद ठेवले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात प्रीपेड रिक्षा स्टॅन्ड बंद केले होते. अद्यापही प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना परवडत नाही. ही स्थिती पूर्ववत झाल्यानंतर स्टॅन्ड पुन्हा सुरु करण्यात येईल.
राजेंद्र देसाई, सरचिटणीस, महाराष्ट्र रिक्षा चालक सेना