राणीच्या बागेत परदेशी पाहुण्यांच्या बाळंतपणाची तयारी

By admin | Published: August 23, 2014 01:39 AM2014-08-23T01:39:35+5:302014-08-23T01:39:35+5:30

बर्फाच्या गोळ्यासारखे, एखाद्या गोंडस बाळाप्रमाणो आनंदाने नाचणारे पेंग्विन हे परदेशी पाहुणो लवकरच मुंबईत मुक्कामासाठी येत आहेत़

Preparations for the arrival of foreign guests in the Queen's garden | राणीच्या बागेत परदेशी पाहुण्यांच्या बाळंतपणाची तयारी

राणीच्या बागेत परदेशी पाहुण्यांच्या बाळंतपणाची तयारी

Next

चंद्रपूर : शहरातील एकही शाळा, महाविद्यालयाचे फायर आॅडिट केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्यावेळी अनुचित प्रकार घडून आग लागल्यास मोठी घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अलीकडे शाळा, महाविद्यालय, रुग्णालयात आगीच्या अनेक घटना घडला आहेत. अशा घटनांमध्ये सामान्यांना जीव गमवावा लागतो. याची दखल घेत शासनाने जीव सुरक्षा व अग्नी सुरक्षा कलम २००६ व २००९ अधिनियमांतर्गत फायर आॅडिट करण्याचा कायदा लागू केला. या नियमांतर्गत सर्व शाळा, महाविद्यालयांना फायर आॅडिट करण्याच्या सूचना दिल्या. यासाठी शासनाने १८२ एजन्सी नेमून या एजन्सीकडे आॅडिट करण्याचे काम सोपविले. एजन्सीने अ‍ॅडिट करून तसा अहवाल मनपा अग्निशमन दलाकडे सादर करायचा आहे. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी क्रॉस चेकिंग करुन तसा अहवाल देणार आहेत.
याबाबत चंद्रपूर मनपाच्या अग्निशमन दलात माहिती घेतली असता, अनेक शाळा व महाविद्यालयांनी आॅडिटच केले नसल्याची धक्कादायक माहिती आहे. नगर पालिकेचे महापालिकेत रूपांतर होऊनही या विषयाकडे अद्याप गांभीर्याने पाहिलेले दिसत नाही. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता, काही शाळांचे फायर आॅडिटसाठी अर्ज आल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात आॅडिटच्या कामाला सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे शाळा, महाविद्यालयात आगीच्या घटना घडल्यास विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका उद्भवण्याची शक्यता आहे. शहरात मनपाच्या ४० शाळा, ५० खासगी शाळा तर ६० च्या जवळपास रुग्णालये आहेत. यापैकी अनेक शाळा व रुग्णालयांचे आॅडिट झालेले नाही. नियमानुसार १५ मीटर उंच इमारतीवर ड्रायडंट सिस्टीम बसविणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक उंच इमारतींवर अशी यंत्रणाच बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी आगीची घटना घडल्यास मोठी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठांनी दखल घेण्याची मागणी आहे.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Preparations for the arrival of foreign guests in the Queen's garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.