महापालिका निवडणुकीची तयारी, २०११पर्यंतच्या झोपड्यांना पाणी देण्याचा सेनेचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 10:28 AM2021-05-14T10:28:10+5:302021-05-14T10:28:10+5:30

​​​​​​​ पालिकेच्या नियमानुसार १९९५पर्यंतच्या झोपड्या संरक्षित मानल्या जातात. तर, राज्य सरकारच्या नियमानुसार २००० पर्यंतच्या झोपड्यांना अभय देण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेने सन २०००पर्यंतच्या झाेपड्यांना पाणी देण्याचा निर्णय घेतला.

Preparations for municipal elections. shiv sena proposal to provide water to slums till 2011 | महापालिका निवडणुकीची तयारी, २०११पर्यंतच्या झोपड्यांना पाणी देण्याचा सेनेचा प्रस्ताव

महापालिका निवडणुकीची तयारी, २०११पर्यंतच्या झोपड्यांना पाणी देण्याचा सेनेचा प्रस्ताव

Next


मुंबई : पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक असल्याने सत्ताधारी शिवसेनेने आतापासूनच मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. त्यानुसार सन २०११पर्यंतच्या झाेपड्यांना पाणी देण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव शुक्रवारी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत चर्चेसाठी येणार आहे. राज्यात शिवसेनेची सत्ता असल्याने ही मागणी मंजूर करून तो अमलात आणणे पालिकेला शक्य होणार आहे.

पालिकेच्या नियमानुसार १९९५पर्यंतच्या झोपड्या संरक्षित मानल्या जातात. तर, राज्य सरकारच्या नियमानुसार २००० पर्यंतच्या झोपड्यांना अभय देण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेने सन २०००पर्यंतच्या झाेपड्यांना पाणी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता सत्ताधारी शिवसेनेकडूनच सन २०११पर्यंतच्या झोपड्यांना पाणी देण्याची मागणी होत आहे. शिवसेेनेचे माजी आमदार, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी मार्च महिन्यात महापौर किशाेरी पेडणेकर यांना याबाबत पत्र पाठवले आहे.

दहिसर येथील गणपत पाटील नगर येथे सन २०००पर्यंतच्या झोपड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याप्रमाणे सन २०११ पर्यंतच्या झोपड्यांना पाणीपुरवठा करण्याबाबत गटनेत्यांच्या बैठकीत यापूर्वी चर्चा झाली आहे. याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. महापौरांनी हे पत्र सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत मांडले आहे. 
 

Web Title: Preparations for municipal elections. shiv sena proposal to provide water to slums till 2011

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.