मुंबई : सीईटी सेलकडून २०२०-२१ च्यशैक्षणिक सत्रातील प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांची अभयसासाठीची लगबग सुरु झाली आहे. प्रवेश परीक्षा उत्तमरीत्या उत्तीर्ण होऊन आपल्याला हव्या त्या क्षेत्रात प्रवेश मिळविण्याची तयारी सुरु असताना अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी आवश्यक ती खाद्पत्रे आणि प्रमाणपत्रे नसल्याने प्रवेशाना मुकावे लागते हा अनुभव आहे. त्यामुळे यंदा विद्याथ्यार्नी प्रवेश परीक्षेची तयारी करताना आवश्यक ती जात प्रमाणपत्रे , उत्पन्नाचे दाखले यांची कार्यवाही सुरु करावी असे आवाहन सीईटी सेलमार्फत करण्यात आले आहे.
राज्यातील सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची सुरुवात झाल्यानंतर त्या काळात काही दिवसांत जात पडताळणी करून घेणे पालकांना आणि एका वेळेस हजारो विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला जावे लागते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्यवसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या आरक्षित प्रवगार्तील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या अगोदरच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते. व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रवेश घेताना जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र द्यावे लागते अनेकदा हे प्रमाणपत्र कधी देण्याचा नियम अचानक बदलले जातात त्यामुळे प्रवेश प्रक्रियेवर मोठा ताण तयार होतो.
प्रत्येक जिल्ह्यात जात वैधता समितीकडे प्रचंड व्याप व प्रलंबित प्रमाणपत्र असल्याने हे काम उरकणे शक्य नसते. अनेकदा विद्यार्थी यासंदर्भात न्यायालयात जातात. त्यामुळे प्रवेशानंतर प्रमाणपत्र सादर करण्याची सवलत न्यायालयाच्या आदेशानुसार मिळवले जाते. त्यामुळे अनेकदा प्रवेश प्रक्रियेच्या मोठ्या गोंधळाला सामोरे जावे लागते. हा गोंधळ दुर करण्यासाठी आणि या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत आणि पुढील वर्षी प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावेत व राज्य सरकारनेही यासंदर्भात कायमचा तोडगा काढण्यासाठी सीईटी सेलचा आतापासूनच प्रयत्न सुरु आहे. त्यासंदर्भात या विद्यार्थ्यांना सरकारपातळीवर मदत व्हावी यासाठी सरकारला विनंती केली जाणार असल्याची माहिती सीईटी सेल आयुक्त संदीप कदम यांनी दिली.
सराव प्रश्नपत्रिकांचीही होणार उपलब्धता
विद्यार्थ्यांना ऑनलाइन सीईटीची भीती वाटू नये, त्यासाठी सीईटी परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना सराव परीक्षेची संधी राज्य सीईटी सेलकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. गतवर्षी एमएचटी-सीईटीची सराव परीक्षा झाली होती त्याच धर्तीवर सर्व अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध केल्या जाणार आहेत.
विद्यार्थ्यांना परीक्षेचा अंदाज यावा तसेच त्यांची भिती दूर व्हावी राज्य सीईटी सेलकडून सराव परीक्षेचे योग्य पद्धतीने नियोजन केले जाणार आहे. यासंदभार्तील सूचना लवकरच संकेतस्थळावर दिल्या जाणार आहे. गतवर्षी एमएचटी सीईटी आॅनलाइन परीक्षेची भीती वाटू नये, यासाठी ठिकठिकाणी सराव परीक्षेची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती. त्याच धर्तीवर सर्वच परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी प्रामुख्याने सीईटी सेलचा प्रयत्न असणार आहे.