आठ वर्षे नुकसान सोसण्याची होती तयारी

By admin | Published: July 24, 2015 02:11 AM2015-07-24T02:11:45+5:302015-07-24T02:11:45+5:30

मुंबई मेट्रो-१ प्रकल्पात सुरुवातीची ८ वर्षे म्हणजेच २0१८पर्यंत नुकसान सोसण्याची तयारी रिलायन्स कंपनीने दर्शविल्याचे, समोर आले आहे

Preparing for eight years was due to the loss | आठ वर्षे नुकसान सोसण्याची होती तयारी

आठ वर्षे नुकसान सोसण्याची होती तयारी

Next

मुंबई : मुंबई मेट्रो-१ प्रकल्पात सुरुवातीची ८ वर्षे म्हणजेच २0१८पर्यंत नुकसान सोसण्याची तयारी रिलायन्स कंपनीने दर्शविल्याचे, समोर आले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगले यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडून मागविलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.
रिलायन्स कंपनी स्वत: सादर केलेल्या बिझनेस प्लॅनच्या विरुद्ध काम करत असल्याचा आरोप गलगली यांनी केला आहे. मुंबई मेट्रो वन रिलायन्स एनर्जी प्राइव्हेट लिमिटेडने या प्रकल्पासाठी २३५६ कोटी खर्च आणि भांडवल साहाय्य १२५१ कोटी नमूद केले होते, तर ३४0४ कोटी खर्च दाखवित आयआयसीयू आयएल अ‍ॅण्ड एफएस या कंपनीने १२९६ कोटी रुपये भांडवल साहाय्याची मागणी केली होती. भांडवल साहाय्य ४५ कोटी कमी असल्यामुळे मुंबई मेट्रो वन रिलायन्स एनर्जी प्राइवेट लिमिटेड या कंपनीस काम मिळाले. यासंदर्भात झालेल्या कराराप्रमाणे २0१0पर्यंत प्रकल्पाचे पूर्ण काम होईल असे रिलायन्स कंपनीने गृहीत धरले होते आणि सुरुवातीची ८ वर्षे ( २0११ ते २0१८पर्यंत ) नुकसान सोसण्याची तयारी दर्शविली होती. २0४४-४५पर्यंत टप्प्याटप्प्याने भाडेवाढ करत प्रत्येक ४ वर्षांनी ११ टक्के भाडेवाढ करण्याचे महाराष्ट्र शासनाने ३ सप्टेंबर २0१३ रोजी निश्चित केले होते. त्याला रिलायन्सनेही सहमती दर्शविली होती. दरम्यान, काम मिळविताना आणि त्यानंतर करारनामा करताना सर्व अटी आणि शर्तीस होकार देणाऱ्या रिलायन्स कंपनीवर एमएमआरडीए प्रशासन फसवणुकीचा गुन्हा का दाखल करत नाही, असा सवाल गलगली यांनी केला आहे.

Web Title: Preparing for eight years was due to the loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.