लाखोंच्या उपस्थितीत इज्तेमा

By admin | Published: December 14, 2015 01:46 AM2015-12-14T01:46:17+5:302015-12-14T01:46:17+5:30

निष्पाप व निरपराधांना ठार मारणे माणुसकीची हत्या करण्यासारखे आहे. इस्लाममध्ये असे कृत्य करणे निषिद्ध असून, प्रेषिद महंमद पैगंबरांनी त्यापासून दूर राहण्याचे बजावले आहे

In the presence of millions, Ijtema | लाखोंच्या उपस्थितीत इज्तेमा

लाखोंच्या उपस्थितीत इज्तेमा

Next

मुंबई : निष्पाप व निरपराधांना ठार मारणे माणुसकीची हत्या करण्यासारखे आहे. इस्लाममध्ये असे कृत्य करणे निषिद्ध असून, प्रेषिद महंमद पैगंबरांनी त्यापासून दूर राहण्याचे बजावले आहे. जगभरातील मुस्लिमांवर त्यांच्या तत्त्वांची जोपासना करण्याची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन सुुन्नी दावती इस्लामी संस्थेचे अध्यक्ष मौलाना शाकीर अली नुरी यांनी आज केले.
या संस्थेतर्फे आझाद मैदानावर आयोजित केलेल्या रौप्यमहोत्सवी वार्षिक सुन्नी दावत इज्तेमाच्या सांगता सोहळ्यात ते उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. भारतासह जगभरात शांतता व समृद्धी नांदो, मानवी मूल्यांची जोपासना करण्याचे आत्मिक बळ सर्वांमध्ये निर्माण होवो, अशी सामूहिक प्रार्थना करीत इज्तेमाची रात्री नऊच्या सुमारास सांगता झाली. गेले तीन दिवस सुरू असलेल्या इज्तेमाला सुमारे सव्वालाखांहून अधिक मुस्लीम बांधवांनी हजेरी लावली. पहिल्या दिवशी केवळ महिलांसाठीच्या विशेष प्रवचनासाठी महिला व तरुणी हजारोंच्या संख्येने सहभागी होत्या.
रोज तीन सत्रांत चाललेल्या प्रवचनामध्ये इस्लामची मूलतत्त्वे व आचरण, प्रेषित महंमद पैगंबरांची जीवनपद्धती व त्यांची शिकवण समजावून सांगण्यात आली. इस्लाममध्ये महिलांचे महत्त्व, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञानाबाबतची मते, परधर्माबाबतची सहिष्णुता आदींबाबत देश व परदेशातील मुस्लीम धर्मगुरू व अभ्यासकांनी सविस्तर विवेचन केले.
त्यामध्ये मौलाना शाकीर नुरी, कारी झाकीरुद्दीन खान, मुफ्ती निझामुद्दीन रिझवी, सय्यद मोईन अशरफ, अल्लामा इफ्तिकार रिझवी, आलामा कमरुझमान खान (सर्व सौदी अरबिया), अल्लामा कमरुल हसन (अमेरिका), अल्लामा अर्षद मिस्बानी, अल्लामा फरगुल कादरी, अरीफ पटेल (सौदी अरबिया), सलीम नुरी (कॅनडा) आदींचा समावेश होता. अत्यंत शिस्तबद्धपणे हा इज्तेमा पार पाडण्यात आला. त्यासाठी सुमारे १,३०० हून अधिक अनुयायी कार्यरत होते. (प्रतिनिधी)

Web Title: In the presence of millions, Ijtema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.