Join us

मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 2:03 PM

सकाळी पावसाने झोडपून काढले.

ठळक मुद्देमुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसह घाट माथ्यावर पावसाचा जोर

 

मुंबई : मुंबईला शुक्रवारी सकाळी पावसाने झोडपून काढले. या दरम्यान कुठे पाणी साचण्याची घटना घडल्या नसल्या तरी काही काळ मुंबईचा वेग कमी झाला होता. दुपारी देखील पाऊस लागून राहिला होता. मात्र त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्याचाचे चित्र होते. आता पावसाचा जोर कमी झाला असला तरी देखील येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसह घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा मुंबईच्या बाजारपेठांत गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी गर्दी झाली. धो धो पाऊस कोसळत असतानादेखील पूजा साहित्याच्या खरेदीसाठी मुंबईकर घराबाहेर पडले होते. बहुतांशी गणेश मूर्ती कार्यशाळेतून गणेश मूर्ती घरासह सार्वजनिक मंडपाकडे रवाना होत असतानाच पावसाचा जोरही वाढत होता. विशेषत: सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत जोरदार पाऊस कोसळला. हवामान खात्याने १० वाजता मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्हयांसाठी ३ तासांकरिता मुसळधारेचा इशारा दिला आणि त्यानुसार मुंबईत ठिकठिकाणी तुरळक जोरदार सरी कोसळल्याचे चित्र होते..............................

सकाळी ८ वाजताशहर ३७.०९पूर्व उपनगर ३७.०२पश्चिम उपनगर २७.२१मुंबईत ८ ठिकाणी झाडे कोसळली.............................

सकाळी ८ वाजताकुलाबा ६२.२सांताक्रूझ ३१.६.............................

सकाळी ९ वाजताचेंबूर १३कांदिवली ३८मालवणी ३०बोरीवली २६दिंडोशी २२दहिसर १८गोरेगाव १३............................. 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटपाऊसमुंबईठाणेपालघररायगडरत्नागिरी