Join us

एकाच मंचावर चार माजी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; 'जवाहर' पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 6:29 AM

कार्यक्रमाची नियोजित वेळ दुपारी चार वाजताची असली तरी सव्वा तीन वाजल्यापासूनच मान्यवरांची मांदियाळी जमली होती.

मुंबई : भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या धगधगत्या यज्ञकुंडात पूर्ण ताकदीने उतरलेले आणि देश स्वतंत्र झाल्यावर नीती-मूल्यांच्या आधारावर आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाजनिर्मितीत अमूल्य योगदान दिलेले स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जीवनप्रवासाची प्रेरणादायक कहाणी विषद करणाऱ्या 'जवाहर' या पुस्तकाचे गुरुवारी मुंबईत चार माजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले.

या राजकीय नेत्यांनी स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतींना उजाळा देतानाच, स्वातंत्र्यसैनिकांनी या समाजासाठी केलेले काम, नीतीमत्तेचे उभे केलेले मापदंड, निगर्वी, निस्पृह पत्रकारिता, माणसातील जिवंत माणूसपणा अशा विविध नैतिक मुद्द्यांवर उहापोह करत सद्य-सामाजिक स्थितीत या सर्व मुद्द्यांची असलेली गरज अधोरेखित केली. अर्थात, त्यामुळे हा कार्यक्रम केवळ वैचारिकच झाला असे नव्हे तर या संपूर्ण कार्यक्रमाला एका कौटुंबिक सोहळ्याचे समृद्ध कोंदण लाभले. 

कार्यक्रमाची नियोजित वेळ दुपारी चार वाजताची असली तरी सव्वा तीन वाजल्यापासूनच मान्यवरांची मांदियाळी जमली होती अन् सांयकाळी सव्वा सहाला औपचारिकरित्या कार्यक्रम संपला तरी पुढे सुमारे तासभर सर्वच जण कार्यक्रमाच्या कौतुक सोहळ्यात दंग झाले होते. केवळ राजकीयच नव्हे तर उद्योग, वकिल, डॉक्टर, कॉर्पोरेट, समाजसेवक, अधिकारी अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांना 'जवाहर' या पुस्तकाची प्रत भेट देण्यात आली. तेव्हा अनेकांना एका प्रेरणादायी चरित्राची पाने कार्यक्रम स्थळीच चाळण्याचा मोह आवरला नाही. 

टॅग्स :उद्धव ठाकरेअशोक चव्हाणलोकमत