योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:16 AM2020-12-04T04:16:08+5:302020-12-04T04:16:08+5:30

योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत लखनऊ महापालिकेचे बाँड वितरित लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ महापालिकेचे बाँड ...

In the presence of Yogi Adityanath | योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत

योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत

Next

योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत लखनऊ महापालिकेचे बाँड वितरित

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ महापालिकेचे बाँड बुधवारी वितरित करण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत मुंबई स्टाॅक एक्सचेंज येथे यासाठीचा बेल रिंगिंग सेरेमनी पार पडला. उत्तर प्रदेशातील महापालिकांना वित्तीय शिस्त लागावी आणि पायाभूत विकास, सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी या वेळी स्पष्ट केले.

कोरोनाच्या कालखंडातच लखनऊ महापालिकेने २०० कोटी रुपये किमतीचे म्युनिसिपल बाँडचे शेअर बाजारात लिस्टिंग करून आत्मनिर्भरतेच्या दिशेने पाऊल टाकल्याचे योगी आदित्यनाथ या वेळी म्हणाले. गुंतवणूकदारांनी चांगला पाठिंबा दिला. लखनऊ पालिकेच्या २०० कोटींच्या बाँडसना ४५० कोटींची बोली लावण्यात आली. गुंतवणूकदारांचा पाठिंबा उत्साहवर्धक असल्याचे सांगतानाच आगामी काळात गाझियाबादचे बाँडही घेण्यात येणार असल्याचे आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर लघू व मध्यम उद्योग आहेत. या उद्योगांना वित्तीय व्यवस्थेत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आतापर्यंत १५ व्यावसायिकांनी मुंबई स्टाॅक एक्सचेंजमध्ये आपले व्यवसाय नोंदविलेले आहेत. गुंतवणूकदार आणि उद्योजकांना उत्तर प्रदेशात सहजपणे कारभार करता यावा, यासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत आवश्यक सोयी-सवलती दिल्याचेही त्यांनी सांगितले.

स्टाॅक एक्सचेंजमधील कार्यक्रमानंतर आदित्यनाथ यांनी हाॅटेल ट्रायडेंट येथे मुंबईतील उद्योजकांशी आणि सिनेजगतातील मान्यवरांशी संवाद साधला.

* उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री

मुंबई स्टाॅक एक्सचेंजला भेट देणारे योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. लखनऊ पालिकेच्या बाँड्सचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आदित्यनाथ यांनी एक्सचेंजच्या २५ व्या मजल्यावरून आजूबाजूचा परिसर न्याहाळला. तसेच, शेअर मार्केटचा इतिहास जाणून घेतानाच प्रत्यक्ष खरेदी-विक्रीही पाहिली. त्यानंतर येथील प्रसिद्ध बैलाच्या शिल्पाजवळ फोटोसेशनही केले.

Web Title: In the presence of Yogi Adityanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.