संमेलनाचे प्रक्षेपण यंदाही सशुल्कच!

By admin | Published: February 2, 2017 02:57 AM2017-02-02T02:57:56+5:302017-02-02T02:57:56+5:30

साहित्य संमेलनाच्या प्रक्षेपणासाठी दूरदर्शन, आकाशवाणी या सरकारी माध्यमांनी पैसे आकारू नयेत, अशी मागणी गेली तीन वर्षे होत असली, तरी यंदाच्या साहित्य संमेलनाच्या

Presentation of the semester this time! | संमेलनाचे प्रक्षेपण यंदाही सशुल्कच!

संमेलनाचे प्रक्षेपण यंदाही सशुल्कच!

Next

डोंबिवली : साहित्य संमेलनाच्या प्रक्षेपणासाठी दूरदर्शन, आकाशवाणी या सरकारी माध्यमांनी पैसे आकारू नयेत, अशी मागणी गेली तीन वर्षे होत असली, तरी यंदाच्या साहित्य संमेलनाच्या थेट प्रक्षेपणासाठीही आयोजकांना पैसे मोजावे लागणार आहे.
दोन वर्षांपूर्वी घुमानच्या साहित्य संमेलनावेळी हा मुद्दा तापला होता, तेव्हा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रत्येक गोष्ट फुकट मागण्याच्या साहित्यिकांच्या वृत्तीवर टीका करत ‘फुकटे’ अशी त्यांची संभावना केल्याने वाद निर्माण झाला होता. ‘जर साहित्य संमेलनाचे प्रक्षेपण फुकट होणार असेल तर नाट्य संमेलनाचेही फुकटात प्रक्षेपण करा, अशी मागणी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी लावून धरली होती.
त्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीच्या साहित्य संमेलनाला किमान शुल्क भरावे लागेल, अशी अट सह्याद्री वाहिनीने घातली आहे.
खाजगी वाहिन्या जर संमेलन फुकटात दाखवतात तर सरकारी वाहिनीला ते का शक्य नाही, असा मुद्दा उपस्थित करत साहित्य महामंडळाने दोन वर्षांपूर्वी हा मुद्दा उचलून धरला होता. पण त्यावर पुढे काहीही झाले नाही. (प्रतिनिधी)

थेट प्रक्षेपण ४ वाजता
- डोंबिवलीच्या साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा ‘सह्याद्री’ वाहिनीवरून दुपारी ४ ते सायंकाळी ७ दरम्यान थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. त्याचे पुन:प्रसारण शनिवारी सकाळी ९ वाजता ‘सह्याद्री’ वाहिनीवरून केले जाणार आहे.
- पूर्वतयारीचा विशेष कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी ७.३० ते ८.३० दरम्यान थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.
- थेट प्रक्षेपण चार वाजतापु. भा. भावे साहित्य संमेलननगरीतील या विशेष कार्यक्रमात संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, स्वागताध्यक्ष गुलाब वझे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, मावळते अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचा सहभाग असेल.

Web Title: Presentation of the semester this time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.