Presidential Election 2022: द्रौपदी मुर्मू मुंबईत दाखल; एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीसांनी केलं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 05:01 PM2022-07-14T17:01:17+5:302022-07-14T17:01:28+5:30

Presidential Election 2022: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी द्रौपदी मुर्मू या एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत.

Presidential Election 2022: NDA presidential election candidate Draupadi Murmu has arrived in Mumbai. | Presidential Election 2022: द्रौपदी मुर्मू मुंबईत दाखल; एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीसांनी केलं स्वागत

Presidential Election 2022: द्रौपदी मुर्मू मुंबईत दाखल; एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीसांनी केलं स्वागत

Next

मुंबई- एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या (Presidential Election 2022) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या मुंबईत दाखल झाल्या आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी द्रौपदी मुर्मू या एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर असून या भेटीत त्या शिवसेना भाजप खासदार आणि आमदारांची लीला हॉटेलमध्ये भेट घेणार आहेत.

शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार का, यावरून बरीच उलट-सुलट चर्चा झाल्यानंतर खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या भावनेचा आदर करून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. यानंतर आता द्रौपदी मुर्मू मुंबई दौऱ्यावर असून, उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, द्रौपदी मुर्मू मातोश्रीवर जाण्याची शक्यता धुसर असल्याचे सांगितले जात आहे. 

द्रौपदी मुर्मू या ओदिशातील आदिवासी नेत्या आहेत. त्या झारखंडच्या नवव्या राज्यापल देखील होत्या. द्रौपदी मुर्मू या ओदिशाच्या रायरंगपुर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्या ओदिशाच्या पहिल्या नेत्या आहेत, ज्या राज्यपाल बनल्या आहेत. याआधी BJP-BJD युती सरकारमध्ये २००२ ते २००४ पर्यंत त्या मंत्री देखील होत्या.

देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळण्याची शक्यता

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची कारकीर्द संपणार असून येत्या 21 तारखेला देशामध्ये नव्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेला नाही. महिला, दलित, मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावी अशी मागणी केली जात होती.

Web Title: Presidential Election 2022: NDA presidential election candidate Draupadi Murmu has arrived in Mumbai.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.