आरोग्य विम्याच्या अवाजवी दरवाढीला चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:05 AM2020-12-06T04:05:59+5:302020-12-06T04:05:59+5:30

आयआरडीएआय : फक्त पाच टक्के प्रीमियम वाढीला परवानगी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आर्थिक स्थिती खालावल्याचे ...

Pressure on the exorbitant price increase of health insurance | आरोग्य विम्याच्या अवाजवी दरवाढीला चाप

आरोग्य विम्याच्या अवाजवी दरवाढीला चाप

Next

आयआरडीएआय : फक्त पाच टक्के प्रीमियम वाढीला परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आर्थिक स्थिती खालावल्याचे कारण देत आरोग्य विमा क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी आपल्या प्रीमियमच्या रकमांमध्ये भरमसाट वाढ केली होती. त्याबाबतच्या अनेक तक्रारी इन्शुरन्स रेग्युलेटरी ॲथाॅरिटी ऑफ इंडियाकडे (आयआरडीएआय) दाखल झाल्यानंतर या कंपन्यांना प्रीमियमची रक्कम केवळ पाच टक्क्यांनी वाढविण्याची किंवा कमी करण्याची मुभा देण्यात आली.

उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांचे क्लेम लक्षणीयरीत्या वाढत असल्याने विमा कंपन्यांच्या परताव्याच्या रकमेत वाढ झाली आहे. आरोग्य विमा काढणाऱ्यांचे प्रमाणही वाढत असले तरी जमा आणि खर्चाचा ताळेबंद बिघडल्याचा विमा कंपन्यांचा दावा आहे. भविष्यात हे संकट अधिक गडद होण्याची भीती कंपन्यांना वाटत आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून अनेक विमा कंपन्यांनी आपल्या प्रीमियमच्या रकमेत ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढ केल्याच्या अनेक तक्रारी आयआरडीएआयकडे दाखल करण्यात आल्या होत्या. त्याबाबत माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असलेल्या वृत्तांची दखलही घेण्यात आली.

* दरवाढीस परवानगी घेतली नसल्याचे उघड

३० सप्टेंबरपर्यंत ३८८पैकी फक्त ५५ विमा योजनांच्या प्रीमियमच्या दरात पाच टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. उर्वरित अनेक कंपन्यांची वाढ त्यापेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. प्रीमियमच्या दरांमध्ये वाढ करण्यापूर्वी आयआरडीएआयची पूर्वपरवानगी क्रमप्राप्त असते. मात्र, जेमतेम पाच कंपन्यांनीच पाच टक्क्यांपर्यंत दरवाढीस परवानगी घेतल्याचे आयआरडीएआयने स्पष्ट केले. त्यानंतर आता आरोग्य विमा क्षेत्रात कार्यरत कोणत्याही कंपनीला आपल्या प्रीमियमच्या रकमेत पाच टक्क्यांपेक्षा जास्त वाढ करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

Web Title: Pressure on the exorbitant price increase of health insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.