रुग्णालयांच्या अवाजवी शुल्क आकारणीला चाप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 05:31 AM2020-08-08T05:31:02+5:302020-08-08T05:31:09+5:30

जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त तसेच विभागीय आयुक्तांनीदेखील त्यांच्या स्तरावर भरारी पथके नेमल्याबाबतचा अहवाल तीन दिवसांच्या आत

Pressure on hospitals to charge exorbitant fees | रुग्णालयांच्या अवाजवी शुल्क आकारणीला चाप

रुग्णालयांच्या अवाजवी शुल्क आकारणीला चाप

googlenewsNext

मुंबई : राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही ते पाहण्यासाठी आता भरारी पथके नेमण्यात आली आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त तसेच विभागीय आयुक्तांनीदेखील त्यांच्या स्तरावर भरारी पथके नेमल्याबाबतचा अहवाल तीन दिवसांच्या आत शासनाकडे पाठवावा, असे पत्र आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्वांना पाठविले आहे.

भरारी पथक काय करणार? अशा आहेत सूचना
च्वेळोवेळी जाहीर केलेल्या शासन निर्णयाचे खासगी रुग्णालयांकडून पालन होत आहे की नाही याची खातरजमा करणार. च्खासगी रुग्णालयांमध्ये अधिसूचना व अधिसूचित दर दर्शनी भागावर लावले की नाही याची पाहणी. च्खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणारी बिले अंतिम करण्यापूर्वी त्याच्या तपासणीसाठी यंत्रणा नेमावी.
च्आकारलेले दर, खासगी वाहने, रुग्णवाहिका यांच्याकडून आकारले जाणारे दर योग्य आहेत की नाही याची तपासणी करावी.
च्महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांनी दाखल होणाऱ्या रुग्णांना कॅशलेस सुविधा देणे यासर्व बाबींची तपासणी.
 

Web Title: Pressure on hospitals to charge exorbitant fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.