मोहरममध्ये लहान मुलांचा क्रूर वापर रोखा
By admin | Published: November 25, 2014 02:14 AM2014-11-25T02:14:50+5:302014-11-25T02:14:50+5:30
मोहरममध्ये लहान मुलांसह मोठय़ांनाही क्रूर पद्धतीने फटके मारले जातात. धर्म आणि परंपरांच्या नावाखाली याचे समर्थन केले जाते,
Next
मुंबई : मोहरममध्ये लहान मुलांसह मोठय़ांनाही क्रूर पद्धतीने फटके मारले जातात. धर्म आणि परंपरांच्या नावाखाली याचे समर्थन केले जाते, त्यामुळे स्वत:ला मारून घेण्यास मनाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने लहान मुलांच्या सहभागावर खुलासा करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत़ फैजल मोहम्मद युसूफ बनारसवाला, अब्दुल रहेमान कुरेशी आणि अरिफ गानी शेख या सामाजिक कार्यकत्र्यानी ही याचिका दाखल केली आहे.
याचिकेद्वारे उपस्थित केलेले मुद्दे हे मानवतेच्या दृष्टीने गंभीर असून, शासनाने आत्तार्पयत यासाठी काहीच पावले उचललेली नसल्याचे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले आहे. तसेच या क्रूर प्रकाराला आळा घालण्यासाठी कोणीतरी याचिका करावी, हे आश्चर्यजनक असल्याचेही कोर्टाने म्हटले आह़े अॅड़ गुणरत्न सदावर्ते यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. 25 ऑक्टोबर ते 4 डिसेंबर्पयत मोहरम पाळला जातो़ या काळात शियापंथीय मुस्लीम स्वत:ला शस्त्रने मारून घेत शरीरावर जखमा करून घेतात. त्यासाठी एकाने वापरलेले हत्यार दुसरी व्यक्तीही वापरत़े त्यामुळे याद्वारे गंभीर रोग पसरण्याची शक्यताही याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे. दु:ख व्यक्त करण्यासाठी हे केले जात असल्याचे परंपरांचा आधार घेऊन सांगितले जाते. इस्लाममध्ये हिंसेला मान्यता दिलेली नसून हे राज्यघटनेच्याही विरोधात असल्याचे याचिकाकत्र्यानी म्हटले आह़े पोलिसांसमोर हा प्रकार सुरू असतो़ त्यामुळे या सगळ्याला मनाई करावी व यातील लहान मुलांच्या सहभागावर र्निबध आणून, तशी हमीच असे करणा:यांकडून घ्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आह़े आता या प्रकरणी राज्य सरकार काय शपथपत्र दाखल करते, हे पाहणोही महत्त्वाचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)
मुळात परंपरांच्या नावाखाली होणारा अल्पवयीन मुलांचा सहभाग हा बालअत्याचाराचाच प्रकार आह़े तेव्हा त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने याचा खुलासा करावा, असे निर्देश न्या़ व्ही़एम़ कानडे व न्या़ अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने दिल़े पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आह़े