‘बीएसएनएल’चे नुकसान रोखण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:06 AM2021-03-24T04:06:42+5:302021-03-24T04:06:42+5:30

- कर्मचारी संघटनांची पंतप्रधानांकडे मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘बीएसएनएल’चे नुकसान रोखण्यासाठी किंबहुना या कंपनीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी ...

To prevent loss of BSNL | ‘बीएसएनएल’चे नुकसान रोखण्यासाठी

‘बीएसएनएल’चे नुकसान रोखण्यासाठी

Next

- कर्मचारी संघटनांची पंतप्रधानांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘बीएसएनएल’चे नुकसान रोखण्यासाठी किंबहुना या कंपनीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी ४जी सेवा तत्काळ सुरू करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी पंतप्रधानांकडे केली आहे. ४जी सेवा उपलब्ध नसल्याने ग्राहकांची संख्या दिवसागणिक कमी होत असून, ती रोखायची असल्यास तत्काळ पावले उचलण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी २०१९च्या अर्थसंकल्पात तब्बल ७० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यामुळे या तोट्यात असलेल्या कंपन्यांना आधार मिळून नवउभारी घेण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, ४जी सेवा कार्यान्वित करण्यात दिरंगाई होत असल्याने या कंपन्या आणखी तोट्यात चालल्या आहेत. दिवसागणिक ग्राहक संख्या रोडावत चालली आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी स्वतः यात लक्ष घालून ४जी सेवा तत्काळ सुरू करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी संचार निगम एक्झिक्युटिव्ह असोसिएशनचे सरचिटणीस के. सेबॅस्टिन यांनी पत्राद्वारे केली आहे.

Web Title: To prevent loss of BSNL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.