प्रदूषण रोखा; अन्यथा वीज, पाणी तोडणार; मंगल कार्यालये, रेस्टॉरंट, हॉटेल्स, बँक्वेट हॉलला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 08:18 AM2024-02-28T08:18:41+5:302024-02-28T08:18:52+5:30

अनेक मंगल कार्यालयांत ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळले जात नाहीत. मोठ्याने बँड वाजवणे, प्लास्टिकचे ग्लास वापरण्यावर आता प्रदूषण मंडळाच्या कडक भूमिकेमुळे नियंत्रण येणार आहे.

prevent pollution; Otherwise electricity, water will break; Pollution Control Board warns Mangal offices, restaurants, hotels, banquet halls | प्रदूषण रोखा; अन्यथा वीज, पाणी तोडणार; मंगल कार्यालये, रेस्टॉरंट, हॉटेल्स, बँक्वेट हॉलला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा इशारा 

प्रदूषण रोखा; अन्यथा वीज, पाणी तोडणार; मंगल कार्यालये, रेस्टॉरंट, हॉटेल्स, बँक्वेट हॉलला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा इशारा 

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह राज्यभरातील मंगल कार्यालये, लॉन्स, क्लब हाऊस, रेस्टॉरंट, हॉटेल्स, मोटेल्स आणि बँक्वेट हॉलने प्रदूषणाचे नियम न पाळल्यास त्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नोटीस दिली जाणार आहे. नोटिसीलाही त्यांनी जुमानले नाही तर विजेसह त्यांच्या पाण्याचे कनेक्शन आता तोडले जाणार आहे.

अनेक मंगल कार्यालयांत ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळले जात नाहीत. मोठ्याने बँड वाजवणे, प्लास्टिकचे ग्लास वापरण्यावर आता प्रदूषण मंडळाच्या कडक भूमिकेमुळे नियंत्रण येणार आहे. नव्याने कोणत्याही तरतुदींचा समावेश करण्यात आलेला नाही. संबंधितांनी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. आता काळजीपूर्वक या गोष्टी तपासल्या जातील. त्यातून प्रदूषण कमी होईल, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे म्हणणे आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने सुजल सहकारी गृहरचना संस्था मर्यादित विरुद्ध पुणे महापालिका यांच्या प्रकरणात दिलेल्या आदेशानुसार 
प्रदूषण नियंत्रण मंडळाने सार्वजनिक सूचना जारी केल्या आहेत. 

 हवा, पाणी आणि ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक त्या सुविधांची, घनकचरा व्यवस्थापनांची पूर्तता करावी.
 संबंधित प्राधिकरणाकडून आवश्यक त्या परवानग्या घ्याव्यात.
 उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून संमतीपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे.
  ध्वनिप्रदूषण नियमांच्या तरतुदींच्या अनुसार संबंधित प्राधिकरणाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.
 जमिनीतील पाण्याचा उपसा करण्यासाठी संबंधित प्राधिकरणांकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.
 संबंधित प्राधिकरणाकडून इमारत नकाशा/ मंजुरी प्रमाणपत्र आणि अग्निसुरक्षा प्रमाणपत्र, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेकडून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे.
 सर्व स्थानिक प्राधिकरणांनी जलप्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन, वाहनतळाकरिता आवश्यक त्या सामायिक सुविधांची तरतूद निश्चित करणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय हरित लवादात वेस्ट ॲण्ड ग्रीन फॉर्म्स सोसायटीविरुद्ध संघराज्य आणि अन्य खटल्याच्या अंतरिम आदेशाचे पालन करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्व घटकांना प्रदूषण नियंत्रणासाठी आणि पर्यावरण निकषांच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा / दिशानिर्देश निश्चित केले आहेत. त्यानुसार, संबंधितांनी निर्देशांचे पालन करावे, अशा सूचना महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आल्या आहेत.

Web Title: prevent pollution; Otherwise electricity, water will break; Pollution Control Board warns Mangal offices, restaurants, hotels, banquet halls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.