गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे भूमिकेतूनच घरपोच मद्यसेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 06:24 PM2020-05-13T18:24:01+5:302020-05-13T18:24:21+5:30

शुक्रवार पासून निर्णयाची अंमलबजावणी : राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप

Preventing congestion, avoiding contact and preventing infection is the role of home brewing | गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे भूमिकेतूनच घरपोच मद्यसेवा

गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे भूमिकेतूनच घरपोच मद्यसेवा

Next

 

मुंबई : लॉक डाऊनमुळे अत्यावश्यक वस्तुखेरीज सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र 4 मे पासून किरकोळ मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु काही ठिकाणी मद्यविक्रीच्या दुकानात गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचे नियमाचे पालन न झाल्याचे निदर्शनास आले. गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतूनच घरपोच मद्यसेवा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारी  सकाळी 10 वाजल्यानंतर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

सदर निर्णय राज्य शासनाने महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील कलम 139 अन्वये विशेष अधिकारात घरपोच मद्यसेवा देण्याबाबतचा आदेश 11 मे रोजी निर्गमित केला आहे.या आदेशाबाबत क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांना याबाबत करावयाच्या कारवाईबाबत आदेश देण्यात आले आहेत. घरपोच मद्यसेवा आदेशाची अंमलबजावणी गुरुवारी सकाळी 10 वाजल्यानंतर करण्यात येणार होती. परंतु क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांकडून सदर आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी डिलिव्हरी बॉय मिळविणे, त्यांची वैद्यकीय तपासणी करणे, ओळखपत्र देणे इत्यादी प्राथमिक तयारीसाठी आणखी एक दिवस आवश्यक असल्याने या आदेशाची अंमलबजावणी शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून करण्यात येणार आहे. घरपोच मद्यसेवा ही सोय ज्या जिल्हयात मद्यविक्री सुरु आहे त्या जिल्हयात आणि संबधित जिल्हाधिकारी यांनी मद्यविक्री करीता ज्या वेळा, दिवस आणि क्षेत्र निर्धारित केलेले आहे त्यातच सदर सोय उपलब्ध होऊ शकते.

Web Title: Preventing congestion, avoiding contact and preventing infection is the role of home brewing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.