धोकादायक दरड परिसरात प्रतिबंधात्मक उपाय करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:06 AM2021-08-01T04:06:29+5:302021-08-01T04:06:29+5:30

मुंबई : काही दिवसांपूर्वी चेंबूर, विक्रोळी आणि भांडुप येथे दरड कोसळून ३२ लोकांचा बळी गेला. मुंबईत अशा २९१ ठिकाणी ...

Preventive measures should be taken in dangerous pain areas | धोकादायक दरड परिसरात प्रतिबंधात्मक उपाय करावे

धोकादायक दरड परिसरात प्रतिबंधात्मक उपाय करावे

googlenewsNext

मुंबई : काही दिवसांपूर्वी चेंबूर, विक्रोळी आणि भांडुप येथे दरड कोसळून ३२ लोकांचा बळी गेला. मुंबईत अशा २९१ ठिकाणी लाखो रहिवासी जीव मुठीत घेऊन जगात आहेत. त्यामुळे दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या परिसरांमध्ये प्रतिबंधात्मक बाबींची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा व अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी आढावा बैठकीत दिले.

यंदाच्या पावसाळ्यातील ‘मिड मान्सून’ आढावा व समन्वय बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. पालिका मुख्यालयात आयोजित विविध यंत्रणांच्या आढावा व समन्वय बैठकीला अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, सुरेश काकाणी उपस्थित होते. तसेच मध्य व पश्चिम रेल्वे, भारतीय नौसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद प्राधिकरण, भारतीय हवामान खाते, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, म्हाडा, मुंबई मेट्रो, राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम खाते, बेस्ट, विविध विद्युत वितरण कंपन्यांच्या प्रतिनिधींसह विविध संस्थांचे प्रतिनिधी हजर होते.

आपत्कालीन‌ व्यवस्थापन खात्यातील सभागृहात झालेल्या या बैठकीत विविध यंत्रणांच्या प्रतिनिधींनी त्यांनी केलेल्या कामकाजाबद्दल माहिती दिली. तसेच आलेल्या आव्हानांची, केलेल्या उपाययोजना व भविष्यातील नियोजनाची माहिती उपस्थितांना दिली, तर काही विभागांद्वारे संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अनुषंगाने यंदाच्या पावसाळ्यात करण्यात आलेल्या विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. तसेच उर्वरित पावसाळ्यात अधिक प्रभावी समन्वय साधनेच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.

भांडुपमध्ये सर्वाधिक धोका....

भांडुप विभागात तब्बल १५२ दरड परिसर आहेत. दरड कोसळण्याच्या छोट्या-मोठ्या घटनाही याच विभागात घडल्या आहेत. दरवर्षी येथील धोकादायक परिसरातील नागरिकांना नोटीस पाठविण्यात येते. मात्र, नागरिक अन्य ठिकाणी स्थलांतरित होत नाहीत, अशी नाराजी अधिकारी व्यक्त करतात.

सर्वाधिक दरड परिसर...

एस... भांडुप...१५२

डी...ग्रँट रोड....१६

एल...कुर्ला...१८

एन घाटकोपर..३२

Web Title: Preventive measures should be taken in dangerous pain areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.