मुंबई : मुंबईतील 269 चौरस फूट घराची सरासरी किंमत किमान रेडी रेकनर रेटप्रमाणो मुंबईकरांच्या वार्षिक उत्पन्नाच्या चार पटीहून कमी असावी असा नियम आहे. मात्र प्रजा फाउंडेशन या सामाजिक संस्थेने केलेल्या सव्रेक्षणात मुंबईतील घरांची किंमत ही मुंबईकरांच्या वार्षिक उत्पन्नाहून बारा पट अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रजाने मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत परवडणा:या घरांवर श्वेतपत्रिका काढत ही माहिती उघड केली आहे.
विविध राजकीय पक्षांनी मुंबईतील घरांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी स्पेशल टाऊनशिप पॉलिसी, क्लस्टर रिडेव्हलपमेंट आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजना असे अनेक प्रकल्प राबविले. मात्र आजही मुंबईतील घरांचा प्रश्न सुटलेला नाही. प्रजाने सादर केलेल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंबईत 1995 ते 2क्14 दरम्यान केवळ 2 लाख 3 हजार 624 सार्वजनिक घरे बांधण्यात आली. सध्या मुंबईत 28 लाख कुटुंबे असून त्यातील 11 लाख 36 हजार कुटुंबे झोपडपट्टीत राहत आहेत. तर 15 हजार 274 कुटुंबे बेघर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.’
विस्तृत माहितीमध्ये 8 टक्के कुटुंबे यांना स्वतंत्र खोलीअभावी इतरांबरोबर खोली वाटून घ्यावी लागत असल्याची माहिती मिळाली. तर 57 टक्के कुटुंबे प्रत्येकी एका खोलीत राहत असल्याचे समजले. तर 41.9 टक्के मुंबईकर झोपडपट्टीत राहतात.
1995-2क्14
सालात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी 2 हजार 622 प्रकल्प शासनदरबारी मंजुरीसाठी आले आहेत. त्यातील 51 टक्के म्हणजेच 1 हजार 344 प्रकल्पांना मंजुरी मिळाली. मंजूर प्रकल्पात 4 लाख 67 हजार 673 घरे उभारण्यात येणार आहेत. त्यातील 2 लाख 43 हजार 471 घरांना सीसी (कमेसमेंट सर्टिफिकेट) आणि 1 लाख 57 हजार 4क्2 घरांना ऑक्युपेशन सर्टिफिकेट (ओसी) मिळालेली आहे.
घरांसंदर्भात आमदारांची कामगिरी
12 विधानसभेत नोव्हेंबर 2क्क्9 ते ऑक्टोबर 2क्14 दरम्यान मुंबईतील 32 आमदारांनी एकूण 4क् हजार 52क् प्रश्न विचारले. त्यातील घरे आणि त्यांसदर्भात विचारलेल्या प्रश्नांची संख्या 5 हजार 97क् इतकी आहे.
संस्थेने केलेल्या सव्रेक्षणानुसार, मुंबईतील 5क् टक्के कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे सरासरी 2क् हजार रुपये इतके आहे. रेडी रेकनरच्या दरानुसार 269 चौरस फुटांच्या घराची किंमत ही 28 लाख इतकी आहे. यानुसार एका सर्वसामान्य कुटुंबाला हे घर घेण्यासाठी 12 वर्षाचा कालावधी लागेल.