- चेतन ननावरे, मुंबईअवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. सर्वच क्षेत्रांना महागाईची झळ बसत असली, तरी फराळ तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या जिन्नसाचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत फारसे वाढले नसल्याने, फराळाच्या बाबतीत तरी मुंबईकरांसाठी ही दिवाळी चांगली जाणार आहे.फराळासाठी लागणारे जिन्नस स्वस्त असल्याने, बाजारात खरेदीसाठी अधिक गर्दी उसळल्याचे ‘द मुंबई ग्रेन डीलर्स असोसिएशन’चे अध्यक्ष रमणीकलाल छेडा यांनी सांगितले. छेडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, महागाईमुळे खरेदीत हात आखडता घेतलेला मुंबईकर, दिवाळी फराळासाठी मात्र खुल्या हाताने खरेदी करत आहे. तांदळाच्या दरामध्येही फारशी वाढ झाली नसल्याने पोह्यांचे दर स्थिर राहिले आहेत. परिणामी, सर्वांना आवडणारा चिवडा महागलेला नाही.डाळींच्या साठ्याबाबत सरकारने घातलेल्या निर्बंधाचेही छेडा यांनी स्वागत केले आहे. सरकारने घातलेल्या निर्बंधामुळे डाळींचे भाव तत्काळ खाली उतरण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी सरकारने छापे टाकत, जप्त केलेल्या डाळींचा साठा हा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थात, मैदा, रवा, डाळीचे पीठ, पिठी साखर, पोहे, वनस्पती तूप यांचे दर गेल्यावर्षीइतकेच आहेत. उलट काही पदार्थांचे दर गेल्या वर्षीहून कमी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. परिणामी, यंदाची दिवाळी व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य मुंबईकरांना खऱ्या अर्थाने खुसखुशीत ठरणार आहे.डाळ रेशनवर उपलब्ध करातूर डाळ, उडीद डाळ या डाळींचे भाव काही काळासाठी वाढले असले, तरी डिसेंबरनंतर डाळीचे दर पुन्हा प्रतिकिलो १०० रुपयांच्या खाली उतरतील, अशी शक्यता छेडा यांनी व्यक्त केली. मात्र, सरकारने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. त्यासाठी डाळींचे वाटप रेशन व्यवस्थेतून केले, तर सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत डाळ पोहोचण्यास मदतही होईल, असे छेडा यांनी सांगितले.दिवाळी फराळ साहित्याचे चालू दरसाहित्यदर रवा३५ ते ४०मैदा३० ते ३५पिठी साखर४०पोहे४०साखर३० ते ३२बेसन७० ते ८०हरभरा डाळ६० ते ८०तूर डाळ१६० ते १८०कोट्यवधींची उलाढाल : मुंबईतील ग्रेन रिटेलर व्यापाऱ्यांची संख्या ४० हजारांवर पोहोचली आहे. प्रत्येक दुकानात दिवाळीच्या काळात किमान ५० क्विंटलपासून १५० क्विंटलपर्यंत माल भरला जातो. त्यानुसार दिवाळीच्या काळात मुंबईत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
फराळ साहित्याचे भाव ‘जैसे थे’
By admin | Published: November 05, 2015 1:55 AM