स्वस्त धान्य दुकानात ५५ रुपये किलोने तूरडाळ, आदिवासी विकास विभागालाही समान दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 05:27 AM2017-11-22T05:27:52+5:302017-11-22T05:28:20+5:30

मुंबई : नाफेडच्या माध्यमातून राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेतून खरेदी केलेली २५ लाख २५ हजार क्विंटल तूरडाळ आता स्वस्त धान्य दुकानांत ५५ रुपये प्रतिकिलो या दराने उपलब्ध होणार आहे.

The price of Rs. 55 / - in the cheap grains shops, the tariff of tribal development and the same rate of tribal development | स्वस्त धान्य दुकानात ५५ रुपये किलोने तूरडाळ, आदिवासी विकास विभागालाही समान दर

स्वस्त धान्य दुकानात ५५ रुपये किलोने तूरडाळ, आदिवासी विकास विभागालाही समान दर

Next

मुंबई : नाफेडच्या माध्यमातून राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेतून खरेदी केलेली २५ लाख २५ हजार क्विंटल तूरडाळ आता स्वस्त धान्य दुकानांत ५५ रुपये प्रतिकिलो या दराने उपलब्ध होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात २०१६-१७च्या हंगामात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजनांतर्गत तुरीची हमीभावाने खरेदी केली होती.
राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाºया योजनांमध्ये १ किलोच्या पॅकिंगसाठी ८० रुपये तर ५० किलोच्या पॅकिंगसाठी ३,७५० रुपये याप्रमाणे तूरडाळीचा पुरवठा करण्यासही कार्योत्तर मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये शालेय शिक्षण विभागाला ३ लाख क्विंटल, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला २१६० क्विंटल आणि महिला व बालविकास विभागाला ३ लाख ६० हजार ६०० क्विंटल तूरडाळ देण्यास मंजुरी देण्यात आली.
>गृह विभाग, सामाजिक न्याय विभाग व आदिवासी विकास विभागालाही याच दरानुसार तूरडाळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त ई-निविदेद्वारे डाळीची खुल्या बाजारात आॅफसेट किंमत ५५ रुपये प्रतिकिलो प्रमाणे विक्री सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Web Title: The price of Rs. 55 / - in the cheap grains shops, the tariff of tribal development and the same rate of tribal development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई