पणत्या गुजरात पुरवणार! दोन ते पाच रुपयांनी किंमत वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 02:26 AM2017-10-09T02:26:18+5:302017-10-09T05:28:56+5:30

काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. संपूर्ण बाजार दिवाळीमय झाला आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री सुरू असून, दिवाळीत महत्त्वाचे स्थान असलेल्याा पणत्यांची खरेदी केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 The price of two-five rupees would be provided by Gujarat, which provided the tilt | पणत्या गुजरात पुरवणार! दोन ते पाच रुपयांनी किंमत वाढली

पणत्या गुजरात पुरवणार! दोन ते पाच रुपयांनी किंमत वाढली

Next

कुलदीप घायवट 
मुंबई : काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. संपूर्ण बाजार दिवाळीमय झाला आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री सुरू असून, दिवाळीत महत्त्वाचे स्थान असलेल्याा पणत्यांची खरेदी केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. बाजारात विविध प्रकारच्या दिव्यांना, पणत्यांना मागणी असून, इतर अनेक प्रकारच्या वस्तूंची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. केंद्र शासनाने लागू केलेल्या वस्तू आणि सेवा करांचा परिणाम या दिवाळीवर झाला आहे. यंदा पणत्यांसाठी २ ते ५ रुपये जास्त मोजावे लागत आहेत, तसेच सर्व वस्तूच्या किमतीमध्ये २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्यांचे विक्रेत्यांसह ग्राहकांचे म्हणणे असतानाच, यंदा ‘गुजरात’च्या पणत्यांनी मुंबई उजळणार आहे.
दसरा संपला आणि आता मुंबईकरांना दीपावलीची उत्सुकता लागली आहे. दिवाळीत परंपरेप्रमाणे दिव्यांची आरास केली जाते. नवीन वर्ष हे प्रकाशमय व्हावे, यासाठी दिव्यांनी घर सजविले जाते, पण एरव्ही ज्या पणतीकडे दिवाळी वगळता कोणाचे लक्ष जात नाही, त्या पणत्या बनविण्याचा प्रवास कसा असतो, हे आपल्याला माहीतच नाही. आपण केवळ दुकानांत जाऊन दिव्यांची खरेदी करतो. त्यामुळे पणत्या कुठे बनतात, माती कुठली, कोणते हात या कामासाठी लागलेले असतात, त्यांचा प्रवास कसा होतो, या सर्व प्रश्नांचा आढावा दिवाळीनिमित्त घेण्यात आला आहे.
पणती बनविण्यासाठी प्रामुख्याने चिकण माती प्रकारातील लाल माती आणि काळी माती वापरली जाते. त्यामुळे पणत्यांची घडण योग्यरीत्या करता येते. पणती बनविण्यासाठी इको फे्रंडलीच साधनांचा वापर केला जातो. पणत्यांसाठी खासकरून गुजरातमधील माती वापरली जाते व गुजरातमधील कारागीर पणती बनविण्यासाठी मुंबईत दाखल होतात. २०० ते ४०० रुपये गोणीच्या दराने गुजरातमधील माती पणती कारागीर खरेदी करून मुंबईत आणतो. या मातीला व्यवस्थितरीत्या चाळले जाते. त्यामुळे मातीला मऊपणा येतो. मातीमध्ये पाणी मिसळून ती भिजविली जाते. मातीचे गोळे तयार केले जातात. साच्याचा वापर करत हाताने किंवा मशिनच्या मदतीने पणतीला आकार दिला जातो. त्यानंतर, तयार झालेल्या पणत्या उन्हामध्ये २ ते ३ दिवसांसाठी सुकविण्यासाठी ठेवल्या जातात. उन्हामध्ये सुकलेल्या पणत्यांना १५ ते २० दिवसांसाठी भट्टीमध्ये शेकविण्यासाठी ठेवले जाते. त्यामुळे पणत्या टणक होतात. भट्टीतून आलेल्या पणत्या विक्रीसाठी सज्ज झालेल्या असतात, परंतु पणत्यांना आकर्षक बनविण्यासाठी त्यांना कलर, डिझाइन केले जाते. या कामाला २ ते ३ तास वेळ लागतो. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पणत्या बाजारात विकण्यासाठी उपलब्ध केल्या जातात. पणत्या बनविण्याचे काम संपूर्ण वर्षभर सुरू असते. या कामामध्ये आमच्या संपूर्ण परिवाराचा सहभाग असतो, तसेच आवश्यकतेप्रमाणे आम्ही कामगार बोलावून घेतो. पणती बनविण्याचे काम हाताने किंवा मशिनने केले जाते, असे पणती विक्रेते पारस गिडीया यांनी सांगितले.

Web Title:  The price of two-five rupees would be provided by Gujarat, which provided the tilt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :diwaliदिवाळी