मुंबई : गेल्या काही दिवसांत भाजीपाल्याची आवक वाढली आहे; त्यामुळे पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. शेवगा आणि बीन्स महागले आहेत.
मुंबईत राज्यातील विविध जिल्ह्यांतून भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येतो. यामध्ये नाशिक, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर येथून जास्त प्रमाणात भाजीपाला येतो. या भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक वाढली झाली आहे.
मेथी १०, शेपू १०, लाल माठ १०, चवळी १०, कोथिंबीर १० जुडी अशी मिळत आहे. शेवगा ८०, पडवळ, तोंडली ४०, हिरवी मिरची ४०, ढोबळी मिरची ३०, टोमॅटो ३०, वाटाणा ३०, कोबी २०, फ्लॉवर ४०, भेंडी ४० वांगी ३० रुपये किलो दराने मिळत आहेत.
फळांचे दर स्थिर आहेत.
सफरचंद १५० रुपये, डाळींब १५००, मोसंबी ५०, संत्री ६०, प्रतिकिलो मिळतात; तर केळी ४० डझन, चिक्कू १०० रुपये प्रतिकिलो मिळत आहे.
किराणा मालाचे दर जैसे थे आहेत. मूगडाळ १००, तूरडाळ ९७, चनाडाळ ७० प्रतिकिलो दराने मिळत आहे. सूर्यफूल, शेंगदाणा आणि पामतेल महागले आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत तेलाचे दर ५ ते १० रुपयांनी वाढले आहेत.
भाजीपाल्याची आवक वाढली असून त्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे भाज्या स्वस्त झाल्या आहेत.
संतोषकुमार गुप्ता, भाजी विक्रेते
भाज्यांचे दर कमी झाले आहेत, ही चांगली बाब आहे. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे. कांद्याचे दरही कमी व्हावेत, अशी अपेक्षा आहे.
शीतल खटके, ग्राहक
बाजारात तेलाचा तुटवडा आहे; त्यामुळे तेलाच्या दरात ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे. तेलाचा तुटवडा कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत तेल आणखी महाग होईल. डाळी आणि ज्वारी, बाजरी, गहू यांचे दर स्थिर आहेत.
राजेश शाह, व्यापारी