छत्र्यांच्या किंमती यंदा २० टक्क्यांनी वाढल्या

By admin | Published: June 19, 2017 03:42 AM2017-06-19T03:42:05+5:302017-06-19T03:42:05+5:30

पावसाची रिमझिम सुरु झाली की, आॅफिस, कॉलेज, शाळांमध्ये जाणाऱ्यांना छत्री ही घ्यावीच लागते़ यंदा छत्री खरेदी करतांना दहा ते वीस रुपये अधिक मोजावे लागणार आहेत़

Prices of umbrellas increased by 20 percent this year | छत्र्यांच्या किंमती यंदा २० टक्क्यांनी वाढल्या

छत्र्यांच्या किंमती यंदा २० टक्क्यांनी वाढल्या

Next

राहुल वाडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : पावसाची रिमझिम सुरु झाली की, आॅफिस, कॉलेज, शाळांमध्ये जाणाऱ्यांना छत्री ही घ्यावीच लागते़ यंदा छत्री खरेदी करतांना दहा ते वीस रुपये अधिक मोजावे लागणार आहेत़ त्याच प्रमाणे रेनकोट, घोंगडी, इरले, टोप्या यांनाही बऱ्यापैकी मागणी आहे. त्यांच्या किंमती मात्र बऱ्यापैकी स्थिर आहेत. चायनिज छत्र्यांची बाजारपेठेत सध्या चलती आहे.
पावसाळयाच्या आगमनाची जोरदार तयारी विक्रमगड व परिसरात सुरु झाली असून बच्चे कंपनीपासून ते लहान मोठयांपर्यत सगळेच त्याच्या स्वागताला सज्ज झाले आहेत. घरांची डागडुजीही सुरू झाली आहे. कौले चाळणे, बदलणे, त्यावर प्लॅस्टीकचे कापड घालणे, डांबर लावणे या कामांना सध्या वेग आला आहे़ याचबरोबर बच्चे कंपनीची शाळा सुरु झाली असल्याने आता पालकांसह बच्चे कंपनीचा मोर्चा खरेदीकडे वळला आहे़ त्यातच प्रथम असलेल्या भावात खरेदी करण्याकडे बहुतेकांचा कल असतो कारण पुढे याच वस्तुंच्या किंमती वाढण्याचीही शक्यता असते़ म्हणूनच छत्रीचीही खरेदी होते आहे़. लहान मुलांच्या छत्रीमध्ये तीन ते चार साईज आहेत़
या छत्र्यांवर कार्टून, विविध प्राण्यांचे फोटो, चित्र आहे. लहान मुलांच्या लांब दांड्यांच्या आणि कलरफुल छत्र्यांना जास्त मागणी आहे़ लेडीज छत्रीमध्ये वेगवेगळे प्रकार खूप आहेत़ थ्री फोल्ड आणि फोर फोल्ड छत्र्याही आहेत़
पण या छत्र्या जोरदार पावसात आणि वादळी वाऱ्यात टिकत नसल्याने त्यांना मागणी तशी कमी असते़ डबलकोटिंग फ्रिल छत्र्यांना अधिक पसंती ग्राहकांकडून मिळत असल्याचे दिसते़ पुरुषांसाठी मात्र काळी आणि लांंब दांडीची छत्री एवढीच चॉईस आहे़. बच्चेकंपनीसाठी टोपी सारखी घालता येईल अशी छत्रीही आहे.

Web Title: Prices of umbrellas increased by 20 percent this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.