मुंबई : अंधेरी येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीचे प्राथमिक कारण शॉर्टसर्किट वर्तविण्यात आले असले, तरी अद्याप मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने अधिकृत माहिती दिलेली नाही. येथील रुग्णालयाला आग लागल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. महत्त्वाचे म्हणजे, रुग्णालयासच आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आग शमविण्याचे प्रयत्न करत असतानाच, येत असलेल्या अडथळ्यांमुळे बचावकार्यास विलंब होत होता. आग शमविण्याचे काम सुरू असतानाच स्थानिक मंडळी आणि लोकप्रतिनिधींनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करण्यास सुरुवात केली होती. दुर्घटनास्थळावरील परिस्थिती लक्षात घेता, सायन रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालयाचे डॉक्टर आणि नर्स यांना घटनास्थळी पाठविण्यात आले होते.
काचेच्या इमारतीमधील धुरामुळे परिस्थिती गंभीरधुरामुळे आतील परिस्थिती गंभीर झाली होती. आतमध्ये फसलेल्या रुग्णांसह इतर नागरिकांना बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दलातर्फे सुरू होते. इमारतीला काचा असल्याने आतमध्ये प्रचंड धूर जमा होता. काचा फोडण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना सांगण्यात आले. काचा फोडल्याने बचाव कार्याला अधिक वेग मिळाला, अशी माहिती स्थानिक नगरसेवक जगदीश कुटी यांनी दिली. दुसरीकडे रुग्णांच्या नातेवाइकांनी परिसरात गर्दी केली होती. रुग्णांच्या ठावठिकाण्याबाबत विचारणा करताना नातेवाईकही भावुक झाले होते. इमारतीच्या मागच्या बाजूला काही रुग्णांना हलविण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.मागच्या प्रवेशद्वाराने सुखरूप बाहेर पडलोचौथ्या मजल्यावरून एमआरआयसाठी खाली आलो. मला एमआरआयच्या मशिनमध्ये टाकण्यात आले होते, परंतु अर्ध्या तासाने रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, बाहेर जा, आग लागली आहे. मला लगेच एमआरआय मशिनमधून बाहेर काढण्यात आले. आम्ही काही जण रुग्णालयाच्या मागच्या प्रवेशद्वारातून सुखरूप बाहेर पडलो, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शी रुग्णाने दिली. दुसरीकडे आगीनंतर वीज गेल्याने काळोख झाला, अशी माहिती एका रुग्णाने दिली. अंधारातून एकमेकांचे हात पकडून आठ ते दहा रुग्ण जिन्याने खाली आल्याचेही एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.पळापळ आणि भीतीअचानक आग लागली. धूर जमा होण्यास सुरुवात झाली होती. जळालेल्या विद्युत तारांचाही वास येत होता. वॉर्डमध्ये संपूर्ण धूर झाल्याने रुग्णांची पळापळ सुरू झाली. यात रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, सिस्टर आणि डॉक्टर आपला जीव वाचविण्यासाठी पळत होते, सर्वत्र तणावाचे, भीतीचे वातावरण होते, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शी रुग्णाने दिली.आपत्कालीन विभागाजवळ आग लागली. काही क्षणाताच तेथून जाण्या-येण्याच्या मुख्य मार्गावर धूर पसरला. त्या धुरात काहीही दिसणे शक्य नव्हते. जीव गुदमरत होता. अशावेळी अग्निशमन दलाला बचत कार्यात रुग्णालयातील कर्मचारीही मदत करत होते. रुग्णालयात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता, अशी माहिती रुग्णालयातील कर्मचाºयांनी दिली.काचा फोडूनबचाव कार्यआग शमविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत होते. जास्तीतजास्त रुग्णांना बाहेर काढून दुसºया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग शमविण्यात यश आले असून, धुराचे लोट मात्र दीर्घकाळ रुग्णालयात पसरले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेरच्या काचा फोडून बचाव कार्य सुरू केले होते. शंभरपेक्षा जास्त रुग्णांना दुसरीकडे हलविण्यात आले आहे. धुरामुळे ज्या रुग्णांची गंभीर अवस्था झाली, त्यांना इतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.- रमेश लटके,स्थानिक आमदारवाहतूककोंडीवर नियंत्रणरुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागली. तिथे अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहोचले होते. चारही प्रवेशद्वाराजवळ अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडी लावून बचाव कार्यासाठी पोहोचले. मात्र, धूर प्रचंड असल्याने बचाव कार्यात अडथळे निर्माण होत होते. त्यावरही मात करण्याचे काम सुरू होते. वाहतूक प्रशासन आणि स्थानिकांच्या मदतीने वाहतूककोंडीवर नियंत्रण ठेवण्यात आले असून, रुग्णवाहिकांना जाण्यासाठी मार्ग मोकळा करण्यात आला.- प्रमोद सावंत,माजी स्थानिक नगरसेवकअपघात नसून केवळ निष्काळजीपणाहा अपघात नसून केवळ निष्काळजीपणा आहे. कामगार रुग्णालय प्रशासन, ठेकेदार, अग्निशमन दलाकडून व एम.आय.डी.सी. प्रशासनामुळे निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. या घटनेस जबाबदार असलेल्या सर्व प्रशासकीय अधिकाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.- रोहन सावंत, विभाग अध्यक्ष, मनसे, अंधेरी पूर्व विधानसभा