मुंबई : श्रावण महिन्याची गोडी वाढविण्यासाठी आता मिती क्रिएशन्सने ‘श्रावण महोत्सव २०१७’ ही भव्य पाककला स्पर्धा आयोजित केली आहे. यंदा दादर, गोरेगाव, बोरीवली, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई या सहा केंद्रांवर ही स्पर्धा होणार आहे. या वैशिष्ट्यपूर्ण ‘श्रावण महोत्सवा’चे ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहेत. या स्पर्धेची दुसरी प्राथमिक फेरी गोरेगावमध्ये रंगणार आहे.यंदाही श्रावण महोत्सवाची संकल्पना आगळीवेगळी असून, ‘उपवासाचा पदार्थ - पण जरा हटके’ हा स्पर्धेचा विषय आहे. दरवेळेप्रमाणे साबुदाणा खिचडी, बटाट्याची भाजी, साबुदाणावडे हे पदार्थ वगळून उपवासाच्या पदार्थांना आधुनिकतेची जोड द्यायचे आव्हान आहे. पदार्थ महिलांनी घरीच बनवून आणायचा असून, त्याची मांडणी स्पर्धेच्या ठिकाणी येऊन करायची आहे.श्रावण महोत्सवाची दुसरी प्राथमिक फेरी नागरी निवारा महिला मंडळ यांच्या सहकार्याने ३ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता पार पडणार आहे. गोरेगाव येथील ज्येष्ठ नागरिक कक्ष, प्लॉट क्र. ६, वेदान्त रुग्णालयाच्या मागे, नागरी परिषद, फिल्म सिटी मार्ग, गोरेगाव येथे होणार आहे. गोरेगाव केंद्राच्या विभागीय प्रमुख माधुरी पाटील या आहेत.
गोरेगावमध्ये श्रावण महोत्सवाची प्राथमिक फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 3:04 AM