प्राथमिक शाळांचे इंटरनेट ठप्प!

By admin | Published: September 29, 2015 11:51 PM2015-09-29T23:51:34+5:302015-09-29T23:51:34+5:30

मुंबई महानगराला लागून असलेला ठाणे हा देशात सर्वात जास्त नागरीकरण झालेला जिल्हा असून दुसरीकडे आदिवासी, दुर्गम भागाचा हा पालघर जिल्हा आहे.

Primary school internet jam! | प्राथमिक शाळांचे इंटरनेट ठप्प!

प्राथमिक शाळांचे इंटरनेट ठप्प!

Next

सुरेश लोखंडे ,  ठाणे
मुंबई महानगराला लागून असलेला ठाणे हा देशात सर्वात जास्त नागरीकरण झालेला जिल्हा असून दुसरीकडे आदिवासी, दुर्गम भागाचा हा पालघर जिल्हा आहे. या दोन्ही जिल्ह्यांमधील प्राथमिक शाळांमध्येच विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे धडे देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु, या दोन्ही जिल्ह्यांतील तीन हजार ५१९ शाळांपैकी बहुतांशी शाळांमध्ये अद्यापही विद्युतपुरवठ्याची सुविधा नसल्यामुळे ई-लर्निंगसह डिजिटल शाळांचा प्रयोग निष्फळ ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सध्याच्या इंटरनेटच्या युगात या दोन्ही जिल्ह्यांतील ग्रामीण भागांच्या ग्रामपंचायतींना इंटरनेटशी कनेक्ट करून त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक शाळादेखील नेटशी जोडण्याचे प्रयत्न या वर्षाप्रारंभीच झाले. याद्वारे प्राथमिक शाळा डिजिटलाइज करून ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे धडे सहजतेने घेणे शक्य होणार असल्याच्या वल्गना सुरू झाल्या आहेत. परंतु, सध्या सुरू असलेल्या सरल प्रणालीच्या माध्यमातून शाळांच्या वास्तूंसह सोयीसुविधा, विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची इत्थंभूत माहिती आॅनलाइन दिली जात आहे. यातून ठाणे जिल्ह्यातील सुमारे १७७४ प्राथमिक शाळांपैकी आतापर्यंत ४० शाळांना अद्यापपर्यंत विद्युतपुरवठ्याची सुविधा नसल्याचे उघड झाले आहे. याप्रमाणेच आदिवासी, दुर्गम जिल्हा म्हणून नावारूपाला आलेल्या पालघर जिल्ह्यात सुमारे १८०० शाळा आहेत. त्यातील दुर्गम भागातील बहुतांशी शाळादेखील वीजपुरवठ्याअभावी वंचित असल्याचे सांगितले जात आहे.
----------
४ग्रामीण भागाला इंटरनेटशी जोडण्याच्या दृष्टीने ठाणे-पालघर जिल्ह्यांतील सुमारे ९४१ ग्रामपंचायतींपैकी बहुतांशी ग्रामपंचायती इंटरनेशी कनेक्ट झाल्या आहेत. या ग्रामपंचायतींच्या सुमारे एक किलोमीटर परिसरातील जिल्हा परिषदांच्या सुमारे ४२२ प्राथमिक शाळा इंटरनेटशी जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. पण, वीजपुरवठ्यासह सततच्या लोडशेडिंगमुळे या इंटरनेट सुविधेचा बट्ट्याबोळ होत असून प्रशासनाच्या दुर्लक्षाअभावी ही सेवा केवळ कागदावरच राहिल्याचे दिसत आहे.

Web Title: Primary school internet jam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.