मुंबई : डायलिसिस यंत्रामुळे कोरोनाचा संसर्ग अन्य लोकांनाही होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे डायलिसिस करण्यासाठी येणाऱ्या सर्व रुग्णांची कोरोनाविषयाची प्राथमिक चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापैकी कोरोनाबाधित आढळून आलेल्या रुग्णांसाठी मुंबईतील पाच रुग्णालयांमध्ये स्वतंत्र डायलिसिस व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिक, श्वसनाचा त्रास, उच्च रक्तदाब, मूत्रपिंंडाचा विकार असे गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका संभवतो. यामुळे अशा व्यक्तींची नोंद हाय रिस्क गटात केली जाते. मात्र नियमित डायलिसिस करण्यासाठी जाणाºया व्यक्तीला कोरोना ची लागण झालेली असल्यास त्यांच्यासाठी रुग्णालयातील काही भाग पूर्णपणे वेगळा ठेवण्यात येणार आहे. अशी सुविधा पाच रुग्णालयांमध्ये शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे.
अशी आहे नियमावली...‘कोरोनाची लक्षणे’ आढळल्यास, त्यांना करोनाबाधितांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणाºया रुग्णालयात उपचारांकरिता पाठविण्यात येणार आहे.पालिकेचे कस्तुरबा रुग्णालय, परळचे केईएम रुग्णालय, महापालिकेच्या अखत्यारीतील मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालय, सैफी रुग्णालय, नानावटी रुग्णालय येथे कोरोनाबाधित रुग्णांच्या डायलिसिसची व्यवस्था आहे. महापालिकेचे नियम न पाळणाºया डायलिसिस सेंटरवर संबंधित नियम व पद्धतीनुसार तत्काळ कारवाई करण्यात येईल.