मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) ३३.५ किलोमीटरच्या मेट्रो-३ या भुयारी मार्गाच्या बांधकामाचे कंत्राट पाच कंपन्यांच्या समूहाला दिले आहे. या प्रकल्पाचे बांधकाम पावसाळ्यानंतर सुरू होणार असले तरी कंपन्यांचे प्रतिनिधी सध्या मनुष्यबळाचे संघटन करणे, प्रकल्पासाठी आवश्यक डिझाईन करणे, वाहतूक मार्गात होणाऱ्या बदलाचे व सोयी-सुविधांचे नियोजन करणे, यंत्रसामग्री पुरवठादारांशी बोलणे, भौगोलिक व भू-तांत्रिक सर्वेक्षण करणे या कामांसाठी सज्ज झाले आहेत.मेट्रो-३ या भुयारी मार्गाच्या सुरळीत व्यवस्थापनेकरिता बांधकाम कंत्राटासोबतच यांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी कामे, ट्रॅकसंबंधी कामे प्रगतिपथावर आहेत. प्रणाली कार्यामध्ये मुख्यत्वे टे्रनच्या डब्यांची (रोलिंग स्टॉक) खरेदी, सिग्नलिंग व दूरसंचार प्रणाली, स्वयंचलित भाडे आकारणी यंत्रणा व सुरक्षा यंत्रणेचा समावेश आहे. सिग्नल-टे्रन कंट्रोल व रोलिंग स्टॉककरिता प्राधिकरण स्वतंत्रपणे प्रमाणित यंत्रणेच्या वापराबाबतचे नियोजन करत आहे. बांधकामांचे वेळापत्रक पाळण्यासोबतच यंत्रणेच्या कामाला गती मिळावी यासाठी यंत्रणेसंबंधी विविध कामांकरिता पूर्वअर्हता निविदा ‘जायका’च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काढण्यात आल्या आहेत.ट्रॅक्शन व विद्युत पुरवठ्याच्या कामाकरिता पूर्वअर्हता निविदा ६ जून रोजी उघडण्यात आल्या आहेत. बोगदा वायुविजन, भुयारी स्थानकांच्या पर्यावरण नियंत्रण यंत्रणाकरिता पूर्वअर्हता निविदा २९ जुलै आणि उद्वाहक व सरकते जिने बनविण्याच्या कामाबाबतच्या पूर्वअर्हता निविदा ५ आॅगस्ट रोजी उघडण्यात येणार आहेत. टे्रनचे डबे (रोलिंग स्टॉक), सिग्नल व टे्रन कंट्रोल, प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे, दूरसंचार प्रणाली यासंदर्भातील कामाच्या पूर्वअर्हता निविदाही लवकरच उघडण्यात येणार आहेत.स्वयंचलित भाडे आकारणी प्रणालीकरिता पूर्वअर्हता अर्ज मागविण्यापूर्वी प्राधिकरणाने संबंधित क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी नुकतेच कार्यशाळेचे आयोजन केले होते, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)च्टे्रन सुरू राहण्याकरिता टे्रनवरील २५ केव्ही ट्रॅक्शन यंत्रणा कार्यरत राहील. त्याद्वारे स्थानके, कारडेपो, बोगद्याकरिता सुरळीत विद्युत पुरवठा करता यावा म्हणून ११० केव्ही उच्चदाबाच्या उपकेंद्रामार्फत वीज पुरवण्यात येईल. च्या कामासाठी धारावी, आरे आणि महालक्ष्मी रेसकोर्स येथे ट्रॅक्शन उपकेंद्र स्थापन करण्यात येणार आहे. शिवाय प्राधिकरण हरित धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध असून, ट्रॅक्शन उपकेंद्र आणि कारडेपोकरिता सौरऊर्जा प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.पॅकेज १ : २९८८.५३ कोटीएल अॅण्ड टी व एसटीईसी समूह, स्थानके : कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौकपॅकेज २ : २५२१.८९ कोटीएचसीसी-एमएमएस समूह, स्थानके : सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोडपॅकेज ३ : २५५७.८४ कोटीडोगस-सोमा, स्थानके : मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, मेट्रो स्टेशन, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक व वरळीपॅकेज ४ : २८३०.१० कोटीसीईसी-आयटीडी, सीईएम-टीपीएल समूह, स्थानके : सिद्धिविनायक, दादर, मेट्रो व शीतलादेवीपॅकेज ५ : २८१७.०२ कोटीजे. कुमार सीआरटीजी, स्थानके : धारावी, बीकेसी मेट्रो, विद्यानगरी, सांताक्रुझपॅकेज ६ : २११८.४० कोटीजे.कुमार-सीआरटीजी, स्थानके : सीएसआयए, सहार रोड, सीएसए-आंतरराष्ट्रीयपॅकेज ७ : २२८१.४५ कोटीएल अॅण्ड टी व एसटीईसी समूह, स्थानके : मरोळनाका, एमआयडीसी, सीप्झ
मेट्रो-३ च्या प्राथमिक कामांना सुरुवात
By admin | Published: July 25, 2016 4:55 AM