पंतप्रधानजी, लॉकडाऊन काळात सेवा बजावणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा उतरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:48 PM2020-04-07T17:48:26+5:302020-04-07T17:49:06+5:30
रेल्वे सज्ज होण्यासाठी रेल्वे कर्मचारी लॉकडाऊन काळात काम करत आहेत. त्यामुळे अशा रेल्वे कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा उतरवा.
मुंबई : कोरोना हे जागतिक संकटासमोर उभे आहे. मात्र या संकटावर मात करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्राणांची बाजी लावत आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लाखांचा विमा उतरविला आहे. मात्र लॉकडाऊननंतर पुन्हा रेल्वे सज्ज होण्यासाठी रेल्वे कर्मचारी लॉकडाऊन काळात काम करत आहेत. त्यामुळे अशा रेल्वे कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा उतरवा, अशी मागणी रेल्वे कर्मचारी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर २४ मार्चपासून लाॅकडाऊन सुरु आहे. त्यामुळे एक्सप्रेस आणि लोकल सेवा पूर्णतः बंद झाली आहे. मात्र, रेल्वेची, रेल्वे रुळांची,ओव्हर हेड वायरची दुरुस्तीची आणि देखभालीची कामे केली जात आहेत. यासह एक्सप्रेसच्या प्रवासी डब्यांचे रूपांतर आयसोलेशन कक्षात केले जात आहे. कोरोना सारख्या साथीशी सामना करून रेल्वे कर्मचारी कर्तव्यावर येत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात सेवा बजावणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा उतरवा, अशी मागणी नॅशनल फेडरेशन ऑफ भारतीय रेल्वेमन यांनी केली आहे.
रेल्वे मंत्रालयाने अर्थमंत्रालयाशी संपर्क साधून लाखांचा विमा उतरविला पाहिजे. माल गाड्या, पार्सल गाड्या चालविण्यासाठी हि उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, कोरोना हा माणसामाणसाद्वारे वाढतो. ही भिती मनात ठेवून रेल्वे कर्मचारी काम करत आहे. अशा अडचणीच्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी 50 लाख रूपयांचा विमा उतरविण्यात यावा, अशी प्रतिक्रिया सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे उपाध्यक्ष अमित भटनागर यांनी दिली.
रेल्वेचे कर्मचारी अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत आहेत. कोरोनाचा धोका पत्करून रेल्वे कर्मचारी काम करत आहेत. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचा विमा उतरविण्यात यावा,अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया ऑल इंडिया एससी, एसटी रेल्वे एम्प्लाइज असोशियनचे सरचिटणीस नितीन कांबळे यांनी दिली.