Join us

प्राइम मेंबर्सना आणखी तीन महिने JIO ची मोफत सेवा

By admin | Published: March 31, 2017 8:52 PM

जिओ मोबाईल धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओ प्राइम मेंबरशिपची मुदत आणखी 15 दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 31 - जिओ मोबाईल धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओ प्राइम मेंबरशिपची मुदत आणखी 15 दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे.आता जिओच्या ग्राहकांना 15 एप्रिलपर्यंत जिओच्या प्राइम मेंबरशिपसाठी नोंदणी करता येईल. कंपनीने प्राइम मेंबर्ससाठी जिओ समर सरप्राईज ऑफर आणली आहे. यामध्ये 15 एप्रिलपूर्वी 303 रुपयांचा प्लान घेणा-या ग्राहकांना तीन महिने मोफत सेवा मिळणार आहे. 
 
एका महिन्यात 7 कोटी 20 लाख लोकांनी जिओ प्राइमसाठी नोंदणी केली आहे. आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय त्याने आम्ही भारावून गेलोय. मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जिओ ग्राहकांसाठी  लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.
 
21 फेब्रुवारीला अंबानी यांनी प्राइम मेंबरशिपची योजना जाहीर केली. या योजनेमध्ये 99 रुपये भरुन तुम्हाला प्राइम मेंबरशिप मिळते. ही योजना वर्षभरासाठी लागू राहिल. प्राइम मेंबरशिपच नव्हे 149 रुपयांपासून कंपनीने वेगवेगळया ऑफर्स आणल्या आहेत. प्राइम मेंबरशिप घेतल्यास जुलैपासून महिन्याला 303 रुपये मोजावे लागतील. यामध्ये 28 जीबी 4जी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. मुदत वाढवल्यामुळे ज्या ग्राहकांना काही कारणामुळे नोंदणी करता आलेली नाही त्यांची सेवा खंडीत होणार नाही. 
 
प्राईम मेंबरशिप ऑफरमध्ये जिओला अपेक्षित ग्राहकांपैकी केवळ 50 टक्के ग्राहकांना कायम ठेवण्यात यश आलं आहे. याशिवाय जिओनं 499 रुपयांचा देखील एक प्लान आणला आहे. प्राईम मेंबरशीपसाठी यूजर्सला 99 रुपये द्यावे लागणार आहेत. यानंतर 12 महिन्यांसाठी 303 रुपयांचा प्लान घेऊन हॅप्पी न्यू इअर ऑफरमध्ये  मिळणा-या सुविधांचा पुढील एक वर्षापर्यंत फायदा घेऊ शकतात. गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओची सेवा ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. 4जी स्पीडसह अनलिमिटेड इंटरनेट जिओनं मोफत पुरवल्यामुळे ग्राहकांच्या जिओवर अक्षरशः उड्या पडल्या होत्या.