पंतप्रधान मोदी अन् राष्ट्रपती कोविंद यांच्याकडून देशवासीयांना दसऱ्याच्या शुभेच्छा
By महेश गलांडे | Published: October 25, 2020 08:47 AM2020-10-25T08:47:37+5:302020-10-25T08:48:21+5:30
देशात अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली असली, तर कोरोनाचे सावट अद्यापही आहेच. त्यामुळे, कोरोनावरील लस निघेपर्यंत सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझर्स या त्रिसुत्रीचा अवलंब सर्वांना करावा लागणार आहे.
नवी दिल्ली - देशात आणि राज्यात सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या दैनंदिन व्यवहारांवर अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. याचा फटका राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनाही बसत आहे. इतिहासात प्रथमच यंदाचा दसरा महोत्सव गर्दी आणि सर्व सांस्कृतिक कार्यक्रम टाळून पार पडत आहेत. त्यामुळे, दसऱ्याच्या सणालाही दरवर्षीप्रमाणे उत्हास दिसून येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशावायींना दसरा आणि महानवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
देशात अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली असली, तर कोरोनाचे सावट अद्यापही आहेच. त्यामुळे, कोरोनावरील लस निघेपर्यंत सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझर्स या त्रिसुत्रीचा अवलंब सर्वांना करावा लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशात महानवमी म्हणजे खंडेनवमी आणि विजयादशमी दसरा साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देशवासीयांना महानवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवरात्रीच्या या पावन दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा-आरती करण्यात येते. माता सिद्धीदात्रीच्या आशीर्वादाने प्रत्येकाला आपल्या कार्यात सिद्धी प्राप्त होईल, अशा शुभेच्छा मोदींनी दिल्या आहेत.
देशवासियों को महानवमी की हार्दिक शुभकामनाएं। नवरात्रि के इस पावन दिवस पर मां दुर्गा की नौवीं शक्ति देवी सिद्धिदात्री की पूजा-अर्चना की जाती है। मां सिद्धिदात्री के आशीर्वाद से हर किसी को अपने कार्यों में सिद्धि प्राप्त हो। pic.twitter.com/fKYiHARytG
— Narendra Modi (@narendramodi) October 25, 2020
राष्ट्रपती रामनात कोविंद यांनीही देशावासीयांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दसऱ्याचा हे पर्व अधर्मावर धर्माचा आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतिक आहे. आनंद आणि उत्साहाचा हा उत्सव, महामारीच्या प्रभावापासून सर्वांच रक्षण करुन देशावासीयांना समृद्धी आणि आनंदी करेल, असे ट्विट कोविंद यांन केलंय.
सभी देशवासियों को दशहरा की बधाई और शुभकामनाएं। यह पर्व अधर्म पर धर्म और असत्य पर सत्य की विजय का प्रतीक है । मेरी कामना है कि हर्ष और उल्लास का यह त्यौहार, महामारी के प्रभाव से सबकी रक्षा कर देशवासियों में समृद्धि व खुशहाली का संचार करे।
— President of India (@rashtrapatibhvn) October 25, 2020
सावरकर सभागृहात होईल शिवसेनेचा दसरा मेळावा
प्रसारमाध्यमांश संवाद साधताना संजय राऊत यांनी दसरा मेळाव्याबाबत सांगितले की, शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. मात्र, सध्या कोरोनाचे सावट असल्याने अनेक नियमांचे पालन करावे लागत आहे. त्यामुळे शिवाजी पार्क येथे या दसरा मेळाव्याचे आयोजन करता येणार नाही. मात्र या सोहळ्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. त्यामुळे दसरा मेळावा आयोजित होईल. पण आम्ही नियम पाळतो. स्वत: मुख्यमंत्रीही नियमांचे पालन करत आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्याचे आयोजन नियमांचे पालन करून शिवाजी पार्कजवळ असलेल्या सावरकर स्मारक येथील सभागृहात होईल.
भगवान गडावरील दसरा मेळावा रद्द
कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र भगवानगडावरील दसरा मेळावा व सीमोल्लंघन सोहळा यावर्षी रद्द करण्यात आला आहे. कोरोनावर लस निघेपर्यंत गडाचे महाद्वार खुले होणार नसल्याची माहिती गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी दिली. भगवानगडाची स्थापना होऊन ६९ वर्ष झाली. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी गडाचे नाव भगवानगड ठेवले. दसरा मेळाव्याची भाविकांची परंपरा कधीही खंडित झाली नव्हती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक विशेषतः वंजारी बांधव मेळाव्याला आवर्जून येतात. समाधी पूजन, गुरूमंत्र, दीक्षा, शस्त्रपूजन व दर्शन सोहळा असे विधी होतात. येथे अहोरात्र महाप्रसाद वाटप केले जाते.