मूर्तिकारांचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना साकडे

By admin | Published: August 20, 2016 02:36 AM2016-08-20T02:36:18+5:302016-08-20T02:36:18+5:30

मूर्तिकारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २२ आॅगस्ट रोजी बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघाच्या वतीने चित्रशाळा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे २२ आॅगस्ट रोजी मुंबई शहर-उपनगरातील

The Prime Minister of the sculptors and the Chief Minister | मूर्तिकारांचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना साकडे

मूर्तिकारांचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना साकडे

Next

मुंबई : मूर्तिकारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २२ आॅगस्ट रोजी बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघाच्या वतीने चित्रशाळा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे २२ आॅगस्ट रोजी मुंबई शहर-उपनगरातील जवळपास ३५० चित्रशाळा हा बंद पाळणार आहेत. आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत मूर्तिकारांच्या मागण्यांची अंमलबजावणी व्हावी, अशी संघाची भूमिका आहे. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही देण्यात आले आहे.
मुंबई शहर-उपनगरात मोठ्या मूर्तीचे ५०० कारखाने व मध्यम-घरगुती गणपतीचे जवळपास १ हजार कारखाने आहेत. एका कार्यशाळेमुळे अप्रत्यक्षरीत्या त्यासंबंधी कमीत कमी १०० ते १ हजार लोकांचा रोजगार अवलंबून असतो. त्यामुळे शासन दरबारी प्रलंबित असणाऱ्या मूर्तिकारांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्या यासाठी मूर्तिकार आक्रमक झाले आहेत.
यात संघटनेच्या अधिकृत मूर्तिकारांना १ जूनपासून नवरात्रीपर्यंत गणेशमूर्ती व दुर्गामाता मूर्ती बनविण्याकरिता परवानगी द्यावी. मूर्तिकारांनी पालिकेला अर्ज दिला की, पंधरवड्यात एक खिडकी अंतर्गत परवानगी दिली जावी. आयुक्तांचा अध्यादेश पाच वर्षांचा असावा व मंडपासाठी घेणारी अनामत रक्कम आजीवन म्हणून एकदाच घ्यावी. संघाकडून प्रशिक्षण घेतलेल्या मूर्तिकारांनाच पालिकेच्या अधिपत्याखाली पूर्व व पश्चिम उपनगरात परवानगी द्यावी, अशा मागण्यांचा समावेश आहे.
मूर्तिकारांच्या जागेवर वृक्षारोपण करून व अनधिकृतपणे वाहने पार्किंग करून जागा अडविण्याचा प्रयत्न केला जातो. हा प्रकार टाळण्यासाठी मूर्तिकारांना परवानगी दिल्यानंतर मंडपाच्या कालावधीपर्यंत त्या जागेच्या आवारात ‘नो पार्किंग झोन’ करावा. तसेच महानगरपालिका व इतर प्रशासकीय परवानग्या घेऊनसुद्धा काही वेळा मंडप उभारणीसाठी होणाऱ्या विरोधाकडे प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे, अशा स्वरूपाच्या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. (प्रतिनिधी)

महानगरपालिकेच्या धोरणानुसार ५०० चौ. फुटांपर्यंत ६६० रुपये, ५०० ते १००० चौ. फुटांपर्यंत ९९० रुपये, १००० चौ. फुटांपेक्षा जास्तसाठी १३२० हे २००७ पासूनचे जागेचे क्षेत्रफळ नियोजित केलेले आहे. परंतु २००७ पासून ते २०१६ या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या दुपटीने वाढली आहे. तसेच घरगुती गणपती यांची संख्या पाचपटीने वाढली आहे. त्यांना आवश्यक असणाऱ्या श्रींच्या मूर्तींची संख्या त्याच पटीने वाढत गेली आहे. ही गरज लक्षात घेता ज्या-ज्या मूर्तिकारांना परवानग्या दिलेल्या आहेत त्या-त्या गटामध्ये जास्तीत जास्त जागा त्यांना उपलब्ध करून द्यावी. चीनच्या बाजारपेठांना आवर घालण्यासाठी या बाजारपेठांतील मूर्तींची बाहेरून होणारी आवक थांबविण्यासाठी मूर्तिकारांना अधिकाधिक परवाने द्यावे.

मूर्तिकारांच्या मागण्यांकडे शासकीय पातळीवर सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता मूर्तिकारांनी या संघाच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन एक दिवसाकरिता चित्रशाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या मागण्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे अशा सर्व संबंधित मंत्र्यांना करण्यात आले आहे.
- गजानन तोंडवळकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघ

Web Title: The Prime Minister of the sculptors and the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.