पंतप्रधान मोदींचे बंधू आंदोलनाच्या पवित्र्यात!
By admin | Published: February 1, 2015 02:46 AM2015-02-01T02:46:11+5:302015-02-01T02:46:11+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान बंधू प्रल्हाद मोदी हे विविध मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
रेशन दुकानदारांसाठी रस्त्यावर : अन्नसुरक्षा कायद्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची टीका
यदु जोशी - मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान बंधू प्रल्हाद मोदी हे रेशन दुकानदार आणि केरोसिन डीलर्सच्या अखिल भारतीय संघटनेचे उपाध्यक्ष असून, ते या दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे आॅल इंडिया फेअर प्राइस अॅण्ड केरोसिन डीलर्स असोसिएशनचा २६ जानेवारीला राष्ट्रीय मेळावा झाला. त्यात प्रल्हाद मोदी यांनी तडाखेबंद भाषण ठोकले. आधीच्या काँग्रेस सरकारने अन्नसुरक्षा विधेयक घाईघाईने लागू केल्याने सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाला, अशी टीका करून आता दुकानदार व ग्राहकांच्या मागण्यांसाठी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही भांडावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
असा असेल आंदोलनाचा कार्यक्रम़़़
10 फेब्रुवारीला राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर निदर्शने
20 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
02 मार्चला मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन
17 मार्चला दिल्लीच्या रामलीला मैदानावर देशव्यापी आंदोलन
आंदोलन करावे लागू नये ही कोणाचीही इच्छा असते, पण मी देखील एक रेशन दुकानदार आहे आणि स्वत:ला संघटनेचा पाईक मानतो.-प्रल्हाद मोदी
काय आहेत मागण्या ?
च्रेशन दुकानदारांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा़
च्रॉकेलचा कोटा वाढवावा़
च्रेशन दुकानाचे भाडे, दोन नोकरांचा पगार आणि वीजबिल सराकारने द्यावे.
च्रेशन दुकानांपर्यंत सरकारने धान्य पोहोचविण्याचा खर्च उचलावा.
च्स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे वितरण रेशन दुकानांमधून करावे.
च्एपीएलच्या बंद केलेल्या धान्याचे वितरण पुन्हा सुरू करावे.
दुकानदार व ग्राहकांच्या मागण्यांसाठी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संघर्ष करण्याचा प्रल्हादभार्इंचा इशारा
कोण आहेत प्रल्हाद मोदी ?
राजकारणापासून दूर असलेले प्रल्हाद मोदी हे रेशन दुकानदार असोसिएशनचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष तथा गुजरात शाखेचे अध्यक्ष असून दुकानदारांच्या मागण्यांसाठी त्यांनी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आंदोलन केले होते. सद्भावना मिशनअंतर्गत नरेंद्र मोदी यांनी उपवास केला तेव्हा प्रल्हाद यांनी,‘ रेशन दुकानदारांबाबतही सद्भावना दाखवा !’, असा चिमटाही काढला होता.