आमचा अधिकार....आम्हाला हवाच!मराठी चित्रपटालाही मल्टीप्लेक्समध्ये प्राइम टाइमचा वेळ देण्यात यावा, असा मुद्दा नुकताच पुढे आला. त्याला अनुमोदनही मिळाले. हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांसाठी वेगळा वेळ राखून ठेवला जातो, मग मराठी चित्रपट सकाळीच का पहावेत...असा प्रश्न उद्भवतो. मराठी सिनेमे प्राइम टाइममध्ये म्हणजेच सायंकाळी ६ ते रात्री ९ च्या दरम्यान चित्रपटांचे खेळ दाखविण्यात यावेत यावर अनेक वेळा चर्चा झाली. २०१० साली तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मल्टीप्लेक्सना परवानगी देताना मराठी सिनेमे दाखविणे बंधनकारक केले होते. वर्षात १२४ खेळ दाखविण्याचे मंजूर केले. चित्रपटांच्या वादावर चित्रपट निर्माता संघटनेचे दोन प्रतिनिधी आणि मल्टीप्लेक्सचे दोन प्रतिनिधी अशी चार सदस्य समिती तोडगा काढेल, असे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. यासाठीच्या बैठकीत मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर, महेश कोठारे, नितीन देसाई तसेच आयनॉक्सचे सिध्दार्थ जैन, अलोक टंडन, सिटी प्राइडचे अरविंद चापळकर, पीव्हीआरचे कमल ज्ञानचंदानी ही मंडळी उपस्थित होती. प्राइम टाइममध्ये एक मराठी चित्रपट दाखविणे बंधनकारक करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील आदेश काढला.हेच पाहा असे प्रेक्षकांवर लादू नकाप्रेक्षकांची आवड पाहता कोणता चित्रपट कोणत्या वेळेत दाखविला पाहिजे हे ठरविले पाहिजे. चित्रपट हाऊसफुल्ल होण्यासाठी अशी कोणती वेळ ठरविण्याची गरजच काय? जर त्या चित्रपटाचा दर्जा चांगला असेल तर प्रेक्षक तो चित्रपट आवर्जून पाहतील. त्यासाठी वेळ निवडण्याची गरज नसावी, असे वाटते. या वेळेत मराठी चित्रपटच पाहा असा प्रेक्षकांना आग्रह धरण्याची गरज नाही.-सागर टिकोणे, वाशी.प्राइम टाइममध्ये गैर काय?सध्या मराठी चित्रपटही दर्जेदार पद्धतीने निघत आहेत. सामाजिक विषयांवर भाष्य करीत सर्वच प्रकारचे चित्रपट मराठीत पहावयास मिळत आहेत. मराठी प्रेक्षकवर्ग मोठ्या संख्येने असूनही त्यांना मराठी चित्रपट पाहावयास मिळत नाहीत. त्यासाठी प्राइम टाइम शासनाने सक्तीचे केले तर त्यात गैर ते काय?- डॉं. ज्योती जोशी, पनवेल.स्क्रीन्स वाढवा; मराठीला न्याय द्यामराठी चित्रपटांनाही प्राइम टाइमचा वेळ दिला पाहिजे. संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी मराठी चित्रपट दाखविण्यात यावे. हा वेळ हिंदी भाषेतील चित्रपटांसाठी राखीव आहे असे ठरविण्याचा अधिकार हा मुळात मल्टीप्लेक्सला का द्यावा? आठवडाभरात जो नवीन चित्रपट रिलीज होईल तो सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा तीनही वेळी दाखविलाच गेला पाहिजे. मल्टीप्लेक्सला जर हे जमत नसेल तर त्यांनी नव्या स्क्रीन्स सुरू कराव्यात.प्राइम टाइमला मराठी चित्रपट अनिवार्यइंग्रजी चित्रपटाला फास्ट आणि फ्युरिअस म्हटले जाते, तर मग मराठी चित्रपटांना का नाही...जर मल्टीप्लेक्सने असा पक्षपात केला तर मग मराठी चित्रपटांचे भविष्य काय? मी स्वत: मराठी भाषिक नसूनही आवडीने मराठी चित्रपट बघते मग महाराष्ट्रातील मराठी भाषिक का नाही बघणार? मराठी भाषेचे चित्रपटही योग्य वेळेत दाखविले तर, ते देखील करोडोंची उलाढाल करू शकतात.-शिल्पी दासगुप्ता, नेरूळ.महाराष्ट्रात मराठीलाच प्राधान्यराज्यात मराठीचे साधे नाव काढले तरी काहींना त्याचा त्रास होतो. महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य मिळत असेल, तर अनेकांना त्याचा त्रास होतो, याचे कारण कळत नाही. महाराष्ट्रात राहून मराठीविषयी एखादा द्वेष करीत असेल तर हे चुकीचे आहे. मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले असून शासनाने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे. - अजय कडू, खारघर.गर्ल्स गँग फ्रिकआऊटसुट्यांची कुणकुण लागल्यावर लगेच सगळे अॅलर्ट होऊन प्लॅनिंग करताना दिसतात. सध्या महाविद्यालयीन तरुणीही एकत्र येऊन बिनधास्तपणे गर्ल्स गँगसोबत फ्रिकआऊट करताना दिसतात. म्हणजे त्यासाठी केवळ व्हॉट्सअपवर ग्रुप करून एखाद्या मेंबरने मेसेज करायचा की, मग प्लॅनिंग करून बीच, किल्ला किंवा मग मैत्रिणीच्या रूमवर जाऊन एन्जॉय करायचा असा प्लॅन असतो. नाइटआऊटचा अड्डामित्र-मैत्रिणींसोबत ‘नाइटआऊट’ म्हणजे जणू फुल्ल कल्लाच. परीक्षा संपली की, रिलॅक्सेशनसाठीचा हा सगळ््यात बेस्ट प्लान असतो. त्यामुळे सध्या सगळेच कॉलेजिन्समध्ये हा प्लान हिट ठरत आहेत. या प्लानच वैशिष्ट्य म्हणजे, जो मित्र किंवा मैत्रिण पेईंगगेस्ट म्हणून राहत असेल त्याच्याच रुम जाऊन मज्जा, मस्ती आणि धम्माल करायची हेच समिकरणं असतं. मग काही फ्रेंड्स केवळ गप्पागोष्टी करुन रात्र जागवतात, मात्र काही टवाळखोर आणि मस्ती करणारी गँग रात्रीतला प्रत्येक मिनिट एन्जॉय करतात.एकला चलो रे...गेल्या काही दिवसांपासून कॉलेजिअन्समध्ये ‘एकला चलो रे..’चा ट्रेंड सेट होताना दिसतोय. म्हणजे कॉलेजच्या परीक्षा संपल्या की बॅग भरायची आणि एकटचं भटकायचं. ‘मुक्त मी’ म्हणत कोणत्याही अनोळखी जागी, अनोळखी माणसांसोबत वेळ घालवायचा. यामुळे कॉलेजिअन्सना जगाची ‘दुनियादारी’ पाहण्याचा अनुभव खूप जवळून घेता येतो. शिवाय, एकट्याने प्रवासातील सगळी आव्हानं पेलण्याचं डेअरिंग वेगळंच असत ना!
मराठी चित्रपटांचा ‘प्राइम टाइम’
By admin | Published: April 13, 2015 10:30 PM