Join us

रक्तातील संसर्गामुळे प्रिन्सचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 6:31 AM

केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान प्रिन्स राजभर या तीन महिन्यांच्या मुलाचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. हा अपघात असल्याचा प्राथमिक अंदाज पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या गेल्या बैठकीत व्यक्त केला होता.

मुंबई : केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान प्रिन्स राजभर या तीन महिन्यांच्या मुलाचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. हा अपघात असल्याचा प्राथमिक अंदाज पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या गेल्या बैठकीत व्यक्त केला होता. याबाबत तीव्र पडसाद उमटल्यानंतर प्रशासनाने सादर केलेल्या अहवालानुसार प्रिन्सचा मृत्यू सेप्टिसेमिशॉक (रक्तातील जंतूसंसर्ग), थर्मल बर्न (भाजल्याने) व एटरियल सेप्टल डिफेक्ट (जन्मजात हृदयरोग) यामुळे झाल्याचा दावा केला.या प्रकरणाची चौकशी पोलीस आणि आता वैद्यकीय शिक्षण, संशोधन संचालनालयमार्फत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. हृदयाला छिद्र असल्याने प्रिन्सला कुटुंबीयांनी केईएम रुग्णालयात ६ नोव्हेंबर रोजी दाखल केले होते. परंतु, अतिदक्षता विभागातील ईसीजी मशीनमध्ये लागलेल्या आगीत प्रिन्स २२ टक्के भाजला. यात त्याची प्रकृती खालावून २१ नोव्हेंबरला मृत्यू झाला. प्रिन्सच्या मृत्यूचे कारण आणि या प्रकरणाची चौकशी त्रयस्थ पक्षाकडून करण्याची मागणी स्थायी समितीमध्ये झाली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने अहवाल समितीला सादर केला.प्रिन्सला जन्मजात हृदयरोग व अरुंद श्वास नलिकेचा त्रास तसेच न्यूमोनिया हे गंभीर आजार होते. त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले होते. ईसीजी मशीनमधून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे त्याचा उजवा हात, छातीचा काही भाग, खांदा व कान भाजला होता. त्यावर उपचार सुरू असताना हाताला गँगरीन पसरू नये म्हणून खांद्यापासून हात कापला. एक आठवडा त्याची प्रकृती स्थिर होती. मात्र न्यूमोनिया व सेप्टिमियामुळे त्याची प्रकृती बिघडून त्याचा मृत्यू झाला, असे अहवालात स्पष्ट केले आहे. ईसीजी मशीन आणि गादीचा जळालेला भाग भोईवाडा पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत दिला आहे.कारवाई अहवालानंतरया दुर्घटनेच्या पोलीस व डीएमईआर चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य कारवाई करण्यात येईल, असे असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :केईएम रुग्णालयमुंबई