Join us

नोटांवर सावरकर अन् मोदींचा फोटो छापा, आ. राम कदमांनी ४ नावं केली ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 1:29 PM

अरविंद केजरीवाल यांच्या मागणीनंतर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनीही ट्विट करून नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावावा अशी मागणी केली आहे

मुंबई - निवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा होत आहे. नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो हटवण्याचा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा केजरीवाल पुढे घेऊन जातायेत, असे संजय निरुपम यांनी म्हटलंय. गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने केजरीवाल यांनी हिंदुत्व कार्ड पुढे आणल्याचं बोललं जात आहे. तर, दुसरीकडे भाजप नेत्यांनीही आता विविध नाव घेत नोटांवर फोटो छापण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातच, आमदार राम कदम यांनी केलेलं ट्विटही चर्चेत आलं आहे. 

अरविंद केजरीवाल यांच्या मागणीनंतर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनीही ट्विट करून नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावावा अशी मागणी केली आहे. त्यांनी शिवाजी महाराजांचा फोटो असलेल्या नोटेचा फोटोही ट्विट केला आहे. याबाबत नितेश राणे म्हणाले की, ही माझी वैयक्तिक भावना आहे. शिवप्रेमी म्हणून मी व्यक्त झालो आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना देशात नाही तर जगात मान्यता आहे. अशा महापुरुषाचा फोटो नोटांवर टाकला तर योग्य राहील ही माझी भावना आहे असं त्यांनी सांगितले. आता, आमदार राम कदम यांनीही एक फोटो ट्विट केला असून त्यामध्ये ४ नोटांचे फोटो आहेत. त्यावर, ४ फोटो असून त्यात वि.दा. सावकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही फोटो नोटांवर छापण्याची मागणी केली आहेत राम कदम यांनी ट्विट करत नोटांचे चार फोटो शेअर केले आहेत. एका फोटोवर छत्रपती शिवाजी महाराज, दुसऱ्या फोटोवर बाबासाहेब आंबेडकर, तिसऱ्या फोटोवर सावरकर तर चौथ्या फोटोवर पंतप्रधान नरेंद्र मोदी. अशा चार नोटांचे फोटो शेअर केले आहेत. यासोबतच अखंड भारत.. नया भारत.. महान भारत.. जय श्रीराम .. जय मातादी ! अशी कॅप्शन दिली आहे. त्यांचे हे ट्विट सध्या चर्चेत आले आहे.

अरविंद केजरीवालांची केंद्राकडे मागणी

भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधीजींसोबतच श्रीगणेश आणि देवी लक्ष्मीचा फोटो छापा, अशी अफलातून मागणी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केली. ही मागणी म्हणजे गुजरात निवडणुकीसाठी केजरीवाल यांनी हिंदुत्वाचे कार्ड खेळल्याचे मानले जात आहे. 'लक्ष्मीला समृद्धीची देवी मानले जाते, तर गणपती विघ्नहर्ता आहे. आम्ही सर्व नोटा बदला असे सांगत नाही. किमान नवीन नोटांवर ही सुरुवात तर भारतीय अर्थव्यवस्था रूळावर केली जाऊ शकते, असे केजरीवाल म्हणाले. इंडोनेशियात ८५ टक्के मुस्लीम आणि केवळ दोन टक्के हिंदू आहेत. मुस्लीम राष्ट्र असूनही तिथल्या नोटांवर गणपतीचे छायाचित्र आहे.

टॅग्स :राम कदममुंबईनरेंद्र मोदी