मुंबई : ताडदेव येथील ड्रमबीट बारविरूद्ध आलेल्या तक्रारींवरून तेथे कारवाईसाठी गेलेल्या खुद्द पोलीस उपायुक्तांनाच तेथील बाऊन्सरनी विरोध करीत पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. यावेळी स्थानिक पोलिसांना बोलावूनही ते घटनास्थळी वेळेवर न पोहोचल्याने अखेर ताडदेव पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ निरीक्षकांची उचलबांगडी करून त्यांची नियुक्ती नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. हा बार ठाकरे परिवाराच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात येते.ताडदेव परिसरातील या ड्रमबीट बारमध्ये अश्लील चाळे चालत असल्याच्या अनेक तक्रारी ताडदेव पोलीस ठाण्यात करण्यात आल्या होत्या. मात्र स्थानिक पोलिसांकडून या तक्रारींची दखल घेतली जात नव्हती नाही. अखेर तक्रारदाराने थेट आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याकडे तक्रार केली. बुधवारी रात्री अंमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे गस्तीवर असताना आयुक्तांनी त्यांच्यावर या बारवर कारवाई करण्याÞची जबाबदारी सोपवली. लांडे आपल्या पथकासोबत तेथे धडकले. त्यांना पाहून बाऊन्सरने दरवाजा लावून घेतला. त्यांनी आपण पोलीस असल्याचे सांगताच, ‘वेळोवेळी हफ्ता पोहचतो ना, तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही..’, असे सांगून त्यांना अडवले. हे ऐकून लांडे संतापले. त्यांनी बाऊन्सरला बाजूला सारत आत प्रवेश केला. तेव्हा बाऊन्सरकडून त्यांच्या सोबतच्या पोलीस कर्मचाºयांना मारहाण करण्यात आली. लांडेनी तात्काळ कारवाई करीत मदतीसाठी ताडदेव पोलिसांना बोलावले. मात्र ते वेळेत पोहचले नाहीत.त्यामुळे लांडे यांनी स्वत:च हे प्रकरण हाताळत कारवाईदरम्यान ८ बारबालांची सुटका केली. यावेळी १० जणांना अटक करण्यात आली. यात १ कॅशिअर, ३ वेटरसह ६ ग्राहकांचा समावेश होता. बारमधून ४० हजार २४० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील अन्य चौघांचा शोध सुरु आहे.>कारवाइत दिरंगाई झाल्याचे उघडकारवाइतील दिरंगाइ झाल्याचे उघड झाल्याने ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक संजय सुर्वे यांची चौकशी सुरू होती. गुरुवारी त्यांना तडकाफडकी नियंत्रण कक्षात हलविण्यात आले. त्यांना तात्पुरत्या स्वरुपात तेथे पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विरेंद्र मिश्रा यांनी दिली.
ताडदेवच्या ड्रमबट बारवर पोलीस उपायुक्तांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 6:42 AM